Kang Tae- Moo Tripathi... भारतीय जोडप्याने ठेवलेले मुलाचे नाव पाहून सारेच चक्रावले, कारण...

Viral News: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगू शकत नाही. अशातच कोरियाई भाषेत मुलाचे नाव ठेवण्यात आलं आहे. त्यावरुन सोशल मीडियावर एकच घमासान रंगलं आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 7, 2024, 03:36 PM IST
Kang Tae- Moo Tripathi... भारतीय जोडप्याने ठेवलेले मुलाचे नाव पाहून सारेच चक्रावले, कारण...  title=
Indian Couple Korean Drama Inspired Baby Name Kang Tae Moo Tripathi

Viral News: अलीकडे वेबसीरीज आणि चित्रपट ओटीटीवर पाहण्याचे तरुणाईला वेड लागले आहे. काहीजण तर कोरियन ड्रामा सीरिज मोठ्या प्रमाणात पाहतात. भारतात के ड्रामाने तर तरुणाईला भुरळ घातली आहे. नेटफ्लिक्सवर सर्वाधीक कोरियन सीरीज पाहिल्या जातात. नेटफ्लिक्सनुसार, त्यांचे 221 मिलियन सब्सक्राइबर्स आहेत. तर, 10 पैकी 6 लोक कोरियन सीरिज पाहतात. कोरियन सीरीजला भुलुनच एका भारतीय तरुणाने त्यांच्या मुलाचे नाव कोरियाईमध्ये ठेवलं आहे. मात्र, सोशल मीडियावर यावरुन चर्चेला उधाण आलं आहे. 

कोरियन सीरीजचे चाहते त्या सीरीज आणि चित्रपटातील कलाकारांच्या इतक्या प्रेमात असतात की ते त्यांच्यासारखा दिसण्याचा प्रयत्नदेखील करतात. इतकंच काय तर, एका भारतीय जोडप्याने त्यांच्या मुलाचे नाव कोरयाई भाषेत ठेवले आहे. या जोडप्याच्या एका नातेवाईकाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट आता चांगलीच व्हायरल होत आहे. 

दिव्या नावाच्या एका महिलेने एक्स (ट्विटर)वर शेअर केले आहे. या पोस्टमध्ये महिलेने म्हटलं आहे की, तिच्या भावाला आणि त्याच्या पत्नीला कोरियन ड्रामा सीरीज पाहण्याचे वेड आहे. आता त्यांना मुलगा झाला आहे. त्यांनी मुलाचे नाव ठेवण्यासाठी तीन कोरियाई नाव निवडले आहेत. यात किम सू हीन त्रिपाठी, चोई स्यूंग ह्यो त्रिपाठी आणि कैंग तई-मू त्रिपाठी अशी तीन नावं निवडली आहेत. यात महिलेने तिसऱ्या नावाला पसंती दर्शवली होती. तसंच, वहिनी आणि भावासोबत झालेले चॅटचा  स्क्रीनशॉटदेखील तिने शेअर केला आहे. यात तिन्ही नाव दिसत आहेत. आता सोशल मीडियावर ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. दरम्यान मुलाचे नाव खरंच कोरियाई भाषेत ठेवलं आहे का? याची मात्री पुष्टी होऊ शकली नाही. 

लोकांनी या पोस्टवर विचित्र सल्ले देण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी तिची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. जे नावं तुम्ही निवडली आहेत ते के ड्रामासाठी काम करतील मात्र जरा विचार करा तुमच्या घरगुती कार्यक्रमात तुम्ही तुमच्या मुलाला किम सू ह्यून नावाने बोलवणार का? असा प्रश्न एका युजरने केला आहे. दुसऱ्या युजरने म्हटलं आहे की, किम चोई कैंग हे फॅमिले नाव आहे पहिले नाव नाही. बाकी तुमची मर्जी. तर, तिसऱ्या युजरने म्हटलं आहे की, जोपर्यंत मुलगा अर्धा कोरियाई होत नाही तोपर्यंत मी माझ्या भावाला सल्ला देईन की असं नाव ठेवू नकोस. नाहीतर शाळा कॉलेज आणि मित्र त्याला खूप चिडवतील. एका युजरने म्हटलं आहे की, मुलाचा हे नाव बदला नाहीतर त्याच्यासोबत खूप वाईट होईल.