Independence Day 2020 : भारत सरकारकडून शौर्य पदकांची घोषणा

या भागातील पोलीस दलाला मिळालं अग्रस्थान....

Updated: Aug 14, 2020, 05:56 PM IST
Independence Day 2020 : भारत सरकारकडून शौर्य पदकांची घोषणा  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत शौर्य पुरस्कार अर्थाच Gallantry awards ची घोषणा केली आहे. केंद्राकडून जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्कारांच्या यादीत जम्मू काश्मीर पोलीस दलाला सर्वात वरचं स्थान मिळालं आहे. तर, दुसऱ्या स्थानावर CRPF आहे. या यादीत उत्तर प्रदेश पोलिसांनी तिसरं स्थान मिळवलं आहे.

पोलीस सेवेत असणाऱ्या आणि सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाच्याच दिवशी सन्मानित करण्यात येणार आहे. गृहमंत्रालयाकडून त्याची नावंही जाहीर करण्यात आली. उत्तर प्रदेशातून २३ पोलीस कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार, ६ जणांना राष्ट्रपती आणि ४ पोलीस कर्मचाऱ्यांना मेरिटोयस पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. एडीजी लॉ एँड ऑर्डर प्रशांत कुमार यांना पोलीस शौर्य पदकानं सन्मानित करण्यात येणार आहे. 

गृहमंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार यंदाच्या वर्षी २१५ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदकासाठी निवडण्याच आलं आहे. तर, ६३१ जणांना Meritorious service साठी पदक प्रदान करण्यात येणार आहे. 

 

यंदाच्या वर्षी कोरोना व्हायरसचा coronavirus प्रादुर्भाव पाहता लाल किल्ल्यावर बहुस्तरीय सुरक्षा कवच अर्थात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. ज्याअंतर्गत जवळपास ४००० सुरक्षा कर्मचारी लाल किल्ल्याच्या भागात गस्त घालतील. याव्यतिरिक्त रेल्वे आणि रस्तेमार्गावरही सुरक्षेचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे.