Millionaires Running Away : जगभरातले अनेक करोडपती आपआपला देश सोडून दुसऱ्या देशात विस्थापित होत आहेत. जगभरात हा ट्रेंडच सुरु झाला. अनेक करोडपती (Millionaires) देश सोडतायत. यामध्ये भारतही मागे नाही आहे. भारतातील तब्बल 8 हजार कोट्याधीशांनी देश सोडला आहे. अनेकांनी हा आकडा एकूण चिंता व्यक्त केली आहे. तर तज्ञाच्या मते हा आकडा चिंतेचे कारण नसल्याची माहिती दिली आहे. दरम्यान नेमकं काय कारण आहे की, करोडपती (Millionaires Running Away) लोक देश सोडतायत? हे जाणून घेऊयात.
Henley and Partners 2022 च्या अहवालानुसार यावर्षी 8 हजार भारतीय करोडपतींनी देश सोडला (Millionaires Running Away) आहे. पण तरीही भारतासाठी ही फारशी चिंतेची बाब नाही. यामागचे कारण म्हणजे, देशातील एकूण हाय-नेट वर्थ इंडिव्हिज्युअल (HNI) च्या आकडेवारीनुसार ही संख्या फक्त 2 टक्के आहे. कारण भारतात एकूण 3.57 लाख करोडपती (Millionaires) आहेत, आणि ही यादी वाढत चालली आहे. सन 2031 पर्यंत भारतात या श्रेणीतील लोकांची संख्या 80 टक्क्यांनी वाढू शकते, अशी अपेक्षा या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
जगभरातल्या अनेक देशातील श्रीमंत (Millionaires) लोक देश सोडून चालली आहे. हे प्रमाण सर्वांधिक कोणत्या देशात आहे, याची क्रमवारी जाणून घेऊयात. भारतात या वर्षी 8 हजार करोडपतींनी (Millionaires Running Away) देश सोडलाय. भारत या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे. तर चीन दुसऱ्या स्थानी आहे. चीनमध्ये 10 हजार करोडपतींनी देश सोडलाय.या क्रमवारीत पहिल्या स्थानी रशिया आहे. रशियाक यावर्षी 15 हजार करोडपतींनी देश सोडलाय.
दरम्यान एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतरीत करणारे हे करोडपती (Millionaires) सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि संयुक्त अरब अमिराती सारख्या देशांना पसंती देतायत.यूएईमध्ये 4,000, ऑस्ट्रेलियामध्ये 3,500 आणि सिंगापूरमध्ये 2,800 लोकांनी आपला देश सोडला आहे. या देशांशिवाय ब्रिटन, इंडोनेशिया आणि मेक्सिको या देशांचाही अशा श्रीमंतांच्या यादीत समावेश आहे.
जगभरातील करोडपती (Millionaires) लोकांनी देश सोडण्याची अनेक कारणे आहेत. या कारणांमध्ये स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे सर्वात मोठे कारण सांगितले जात आहे.या श्रीमंतांना इतर देशांमध्ये अधिक आर्थिक ताकद दिसत आहे. याशिवाय आरोग्य, शिक्षण आणि उत्तम जीवनशैली आणि गुन्ह्यांमध्ये घट यांसारख्या भक्कम मूलभूत सुविधा ही देखील मोठी कारणे आहेत.
दरम्यान भारतात 8 हजार करोडपतींनी (Millionaires) या वर्षात देश सोडला आहे. मात्र अनेकांना ही भारतासाठी चिंतेची बाब वाटतेय, मात्र तरीही तज्ञाच्या मते हा आकडा चिंतेचे कारण नाही आहे.