मुंबई : आपण नेहमीच कुठेही प्रवास करण्यासाठी ट्रेनचा पर्याया निवडो. मग तो लांबचा असो किंवा जवळचा प्रवास, ट्रेन नेहमीच आपल्या ठरवलेल्या वेळेत पोहोचवते आणि हे कमी खर्चीक देखील आहे. आता होळी जवळ आली आहे. त्यामुळे निश्चितच रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकसंख्येत वाढ होणार आहे. परंतु त्यापूर्वी ट्रेनने प्रवास करण्याच्या या नवीन गाइडलाइनबद्दल तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. कारण यामुळे तुम्हाला विनाकारण दंड लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ट्रेनने प्रवास करण्यापूर्वी रात्री झोपण्याचे नवीन नियम जाणून घ्या.
खरे तर प्रवाशांची सोय लक्षात घेता, रेल्वे अनेकदा नियम बनवते. यापूर्वी रेल्वेने कोरोनाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. आता प्रवाशांच्या तक्ररीवरुन रेल्वेने झोपण्याचे काही गाइडलाईन तयार केल्या आहेत.
या नव्या नियमानुसार आता तुमच्या सीट, डब्यात किंवा डब्यातील कोणताही प्रवासी मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलू शकणार नाही आणि मोठ्या आवाजात गाणीही ऐकू शकणार नाही. आता यामुळे कोणत्याही प्रवाशाच्या झोपेचा त्रास होणार नाही. एवढेच नाही तर या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कारवाईची तरतूद देखील केली आहे. म्हणजेच आता तुम्ही ट्रेनमध्ये शांतपणे झोपू शकता.
हे नियम तातडीने लागू करावेत, असा आदेश रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या सर्व झोनला जारी केला आहे. या नवीन नियमांनुसार, कोणत्याही प्रवाशाने तक्रार केल्यास ती सोडवण्याची जबाबदारी ट्रेनमध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांची असेल.
मोबाईलवर गाणी ऐकण्याबरोबरच लोक ग्रुपमध्ये बसून मोठमोठ्याने बोलतात आणि हसतात, विनोद करतात अशा अनेक तक्रारीही रेल्वेकडे आल्या होत्या. याशिवाय लोकं रात्ररात्रभर दिवे सुरू ठेवतात. यामुळे देखील लोकांमध्ये वाद होतात. परंतु यासंदर्भात देखील रेल्वेने नियम बनवले आहे. ज्यामध्ये रात्री 10 नंतर ट्रेनमधील दिवे बंद करण्याबाबत देखील त्यांनी सांगितले आहे. परंतु नाईट लॅम्प तुम्हाला चालू ठेवावा लागेल.