मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी गूड न्यूज आहे. रेल्वेमध्ये 339 पदासांठी (indian railway jobs 2021 latest updates) भरती सुरु केली आहे. विशेष म्हणजे कोणतीही परीक्षा न देता ही संधी मिळणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने (South East Central Railway Apprentice) अप्रेंटिसच्या 339 पदांसाठी ही भरती आहे. 10 पास असलेले उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. याशिवाय इच्छुक उमेदवार हे संबंधित विषयात आयटीआय उत्तीर्ण असायला हवेत. (indian railway rrb vacancy for 339 aprentis post South East Central Railway know details)
उमेदवारांना या भरतीबाबतची सविस्तर माहिती ही दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या secr.indianrailways.gov.in अधिकृत वेबसाईटवरुन जाणून घेता येईल. या पदासांठी आजपासून (11 सप्टेंबर) अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. तर 10ऑक्टोबर हा अर्ज करण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. फक्त नि फक्त मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. निवड झाल्यानंतर उमेदवारांना वर्षभर ट्रेनिंग घ्याव लागेल. त्यानंतर अप्रेंटिसचं काम सुरु करता येईल.
या बाबी ध्यानात ठेवा....
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अप्रेंटिसबाबतची अधिसूचना (Indian Railway Recruitment 2021) वाचून घ्यावी. उमेदवारांची वयोमर्यादा 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावी. उमेदवारांची निवड 10 वी आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. यामध्ये निवडीसाठी कोणत्याही परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले नाही. ही भरती रेल्वेच्या विविध विभाग/ट्रेड्ससाठी केली जाणार आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे याबाबत खात्री करुन घ्यावी.
खालील पदासांठी भरती...
शीट मेटल वर्कर - 05
ड्राफ्टमन / सिविल - 04
गॅस कटर - 20
ड्रेसर - 02
मेडिकल लेबोरेटरी टेक्निशियन पॅथोलॉजी-03
चिकित्सा प्रयोगशाला टेक्निशियन कार्डियोलॉजी - 02
हॉस्पिटल आणि व्यावसायिक आरोग्य केंद्रांसाठी मॅकेनिक चिकित्सा उपकरण - 01
डेंटल लॅब टेक्नीशियन - 02
फिजियोथेरेपी टेक्निशियन - 02
रुग्णालय अपशिष्ट प्रबंधन टेक्निशियन - 01
रेडियोलॉजी टेक्निशियन - 02