रिटायर्ड कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरी देणार रेल्वे, करावे लागेल हे काम

इंडियन रेल्वे आपला वारसा जपण्यासाठी जुन्या साथीदारांना अर्थात रिटायर्ड कर्मचाऱ्यांची मदत घेणार आहे. यासाठी ६५ वर्षाहून कमी वयाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. 

Updated: Jun 13, 2018, 09:36 PM IST
रिटायर्ड कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरी देणार रेल्वे, करावे लागेल हे काम title=

मुंबई : इंडियन रेल्वे आपला वारसा जपण्यासाठी जुन्या साथीदारांना अर्थात रिटायर्ड कर्मचाऱ्यांची मदत घेणार आहे. यासाठी ६५ वर्षाहून कमी वयाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना दर दिवसाला १,२०० रुपये दिले जातील. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली. रेल्वे बोर्डाने वाफेचे इंजिन, जुने डबे, वाफेवर चालणारी क्रेन, जुन्या काळातील सिग्नल, स्टेशन उपकरण आणि वाफेवर चालणाऱ्या गाड्यांमधील जुन्या वस्तू संग्रहित करण्यासाठी रिटायर्ड रेल्वे कर्मचाऱ्यांना सामील करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलीये.

वारसा जपून ठेवण्यासाठी प्राधान्य देणार

रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिटायर्ड कर्मचाऱ्यांकडे रेल्वेचा वारसा कसा सुरक्षित ठेवता येईल कशी काळजी घेता येईल याचा अनुभव आहे. यासोबतच नव्या पिढीसाठी ते प्रशिक्षक म्हणून काम करु शकतात. हे सोपे काम नाही. एक घड्याळ आहे जे १५० वर्षे जुने आहे. इतक्या वर्षानंतरही सुरु आहे. जुन्या जमान्यातील कर्मचाऱ्यांमध्ये ही खुबी आहे. इतक्या वर्षांच्या उपेक्षेनंतर रेल्वेने पुन्हा एकदा आपला वारसा जपून ठेवण्यासाठी काही पावले उचलली आहेत. 

झोनल प्रमुखांच्या बैठकीत घेतला निर्णय

झोनल प्रमुखांच्या नुकताच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रेल्वे बोर्डाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, बोर्ड विभागाच्या प्रमुखांना अधिकाधिक १० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना भर्ती करण्याचे अधिकार देण्यात आलेत.