इंडिगो एअरलाईन्सची प्रवाशांसाठी खास ऑफर

विमानाने प्रवास करण्याची सुवर्णसंधी...

Updated: Jul 11, 2018, 12:19 PM IST
इंडिगो एअरलाईन्सची प्रवाशांसाठी खास ऑफर title=

नवी दिल्ली : एअरलाईन्स कंपनी इंडिगोला 12 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने इंडिगो एअरलाईन्सने प्रवाशांसाठी एक खास ऑफर आणली आहे. फक्त 1212 रुपयांत आता तुम्हाला विमानप्रवास करता येणार आहे. या तिकीटांचे बुकींग सुरु झालं असून 25 जुलै ते 30 मार्च 2019 पर्यंत तुम्हाला हा प्रवास करता येणार आहे. 13 जुलैपर्यंतच तुम्हाला बुकींग करता येणार आहे.

इंडिगोचा 12 व्या वर्धापन दिनानिमित्त 12 लाख सीट्स बुकींग करण्याचा मानस आहे. महत्त्वाचं म्हणजे या ऑफर अंतर्गत तुम्हाला आंतरराष्ट्रीय प्रवास देखील करत येणार आहे. इंडिगोचे प्रमुख अधिकारी विल्यम बोल्टर यांनी म्हटले की, भारतीय एअरलाईन्स ही सर्वात मोठी घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. 4 ऑगस्ट रोजी इंडिगो कंपनीला 12 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे हा दिवस स्मरणीय ठेवण्यासाठी आम्ही ही घोषणा करत आहोत. देशातील 57 शहरांमध्ये 12 लाख सीट्सचे बुकींग होणार आहे. या बुकींगवर कमीत-कमी 3000 रुपयांचे तिकीटवर भारतीय स्टेट बँकेचे क्रेडिट कार्ड वापरल्यास प्रवाशांना 5 टक्के डिस्काऊंटही मिळणार आहे.