...म्हणून इंडिगोचे विमान तातडीने उतरवले!

दोहाच्या दिशेने जात असलेल्या  इंडिगोच्या विमानाचे ताबडतोब लँडिंग करण्यात आले. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 16, 2017, 02:09 PM IST
...म्हणून इंडिगोचे विमान तातडीने उतरवले! title=

चेन्नई : दोहाच्या दिशेने जात असलेल्या  इंडिगोच्या विमानाचे ताबडतोब लँडिंग करण्यात आले. मात्र याचे कारण ऐकून तुम्ही चकीत व्हाल. विमानाला चिमणी धडकल्याने हा निर्णय घेण्यात आला. विमानातून १३४ प्रवासी आणि ७ क्रू कर्मचारी प्रवास करत होते. 

विमानतळावरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उडालेल्या या विमानाला चिमणी धडकली. या घटनेनंतर रात्री सुमारे २.४५ मिनिटांनी चेन्नई विमानतळावर हे विमान तातडीने उतरवण्यात आले. 

विमान सुरक्षितपणे उतरल्यानंतर सर्वानी सुटकेचा निःश्वास टाकला. प्रवाशांना उतरवून वेटिंग रूममध्ये पाठवण्यात आले. 

त्यानंतर प्रवाशांना सकाळी ४:३० च्या दुसऱ्या विमानाने पाठवण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेनंतर विमान दोन तासांनंतर डोहासाठी रवाना झाले. 

गेल्या काही दिवसांपासून इंडिगो एअरलाईन्स चर्चेत आहे. अलीकडेच  तिरुवनंतपुरम-बंगळूर फ्लाईट दरम्यान लॅपटॉपला आग लागण्याचा प्रकार समोर आला. क्रू ने अग्निशमक यंत्राच्या मदतीने ही आग विझवली.