जकार्ता: इंडोनेशियातील सुमात्रा आणि जावा बेटांच्यामध्ये असणाऱ्या सुना किनारपट्टीला शनिवारी रात्री त्सुनामीचा तडाखा बसला. यामध्ये १६८ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल ५८४ जण जखमी झाले आहेत. त्सुनामीमुळे येथील सर्व यंत्रणा विस्कळीत झाल्याने वित्तहानी आणि जीवितहानीचा नेमका अंदाज येण्यासाठी आणखी काही वेळ जावा लागेल. स्थानिक यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, सुंदा द्विपाच्या परिसरात भूस्खलन ही त्सुनामी निर्माण झाली. त्यामुळे पँडेगलांग, सेरंग आणि दक्षिण लँपुंग या किनारपट्टीलगतच्या प्रदेशाला मोठा फटका बसला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार त्सुनामीमुळे समुद्रात तब्बल १५ ते २० मीटर मीटर उंचीच्या लाटा निर्माण झाल्या. या त्सुनामीमुळे परिसरातील अनेक इमारती अक्षरश: जमीनदोस्त झाल्या आहेत. सध्या मदत यंत्रणांकडून या परिसरात बचावकार्य सुरु आहे.
Death toll hits 168 after Indonesia tsunami, reports AFP quoting officials https://t.co/HqJK2NwcZr
— ANI (@ANI) December 23, 2018
इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर याच वर्षी झालेला भूकंप आणि त्सुनामीत ८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तर, डिसेंबर २००४ साली पश्चिम इंडोनेशियाच्या सुमात्रा या ठिकाणी मोठा भूकंप आला होता. या भूकंपाची तीव्रता ९.३ रिश्टर स्केल इतकी होती.