श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणा-या दहशतवाद्यांविरोधात सुरू केलेल्या कारवाईत सुरक्षा रक्षकांना आणखी एक मोठं यश मिळालं आहे. माछिल सेक्टरमध्ये सुरक्षा रक्षकांनी घुसखोरीचा प्रयत्न करणा-या ५ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
त्यासोबतच त्यांच्या जवळीच शस्त्रास्त्रही जप्त करण्यात करण्यात आले आहेत. हे दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरकडून माछील सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत होते. याआधीही सुरक्षा रक्षकांनी घुसखोरीचे अनेक प्रयत्न हाणून पाडले आहेत.
J&K: Infiltration bid foiled by security forces in Machil sector. 5 terrorists killed, weapons recovered. pic.twitter.com/H7QWIT6KaS
— ANI (@ANI_news) August 7, 2017
सेनेकडून सांगण्यात आले आहे की, ‘आज माछिल सेक्टरमध्ये घोसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. सध्या सेनेकडून या परिसरात सर्च ऑपरेशन केलं जात आहे. सर्च ऑपरेशन दरम्यान पाच शस्त्रास्त हस्तगत करण्यात आले आहेत’.
एकीकडे सुरक्षा रक्षक काश्मीरमध्ये आपल्या ‘शोधा आणि मारा’ ऑपरेशनच्या माध्यमातून दहशतवाद्यांचा सफाया करत आहेत. तर दुसरीकडे घोसखोरीच्या प्रयत्नांना नियमीत हाणून पाडले जात आहे. दोन्ही स्तरावर सुरू असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या या रणनितीमुळे दहशतवाद्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विशेषकरून अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांवर विरोधात सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशनमध्ये वेग बघायला मिळत आहे.