भारतात दारुच्या दुकानावर वाईन शॉपच का लिहिलं जातं... तुम्हाला माहितीय या मागील कारण?

आपल्या देशात प्रत्येक भागात आपल्याला एक ना एक तरी दारुचं दुकान पाहायला मिळतं. जेथे आपल्या लोकांची प्रचंड गर्दी देखील दिसते.

Updated: Mar 5, 2022, 03:36 PM IST
भारतात दारुच्या दुकानावर वाईन शॉपच का लिहिलं जातं... तुम्हाला माहितीय या मागील कारण? title=

मुंबई : आपल्या देशात प्रत्येक भागात आपल्याला एक ना एक तरी दारुचं दुकान पाहायला मिळतं. जेथे आपल्या लोकांची प्रचंड गर्दी देखील दिसते. मुख्यता सुट्टीच्या वारी लोकं येथे गर्दी करतात. या दुकानात वेगवेगळ्या प्रकारच्या दारु मिळतात. जसे की, वाईन, बीअर, विस्की, वोडका, स्कॉच आणि बरंच काही. परंतु तुम्ही कधी विचार केलाय की एवढ्या प्रकारच्या दारु एका दुकानात मिळत असल्या तरी देखील या दुकानाला वाईन शॉप का म्हणातात? किंवा त्यावर वाईन शॉपच का लिहिले जाते?

तसे पाहाता यामागे तसे निश्चित असे कारण नाही. परंतु राजे महाराजांच्या काळात मद्य म्हणून वाईनचाच जास्त वापर केला जात होता. त्यावेळेला इतर दारुबद्दल कोणाला महिती नव्हते.

एवढेच नाही तर वाईन बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या मशिन्स लागत नाहीत. त्यामुळे वाईनचाच जास्त वापर व्हायचा. ज्यामुळे आता ही जेव्हा दारुची दुकानं खोल्ली जातात तेव्हा त्यावरती वाईन शॉप असे लिहिले जाते आणि लोकांच्या तोंडात देखील हा शब्द आधीपासूनच बसला असल्यामुळे लोक त्याचा वापर करतात.

हे असं फ्युअर स्टेशन संदर्भात देखील होतं. जसे की, पेट्रेल पंपवरती आपल्याला पेट्रेल आणि डिजेल दोन्ही मिळते. परंतु तरी देखील आपण त्याला पेट्रेल पंप म्हणतो. हे असंच वाईन शॉपच्या बाबतीत देखील घडतं.

परंतु आता ट्रेंडनुसार देखील ही नावं बदलू लागली आहेत, ज्यामुळे काही लोक आता आपल्या दुकानावर बीअर शॉप किंवा लिकर शॉप लिहू लागले आहेत.