नारायण-सूधा मूर्तींनी तिरुपती बालाजी चरणी दान केले सोन्याचे कासव व शंख; 'या' दानाला किती महत्त्व?

Narayana Murthy Sudha Murthy Donate Gold At Tirupati Balaji: नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांनी तिरुपती बालाजीच्या चरणी सोन्याचे दान केले आहे. याची किंमत ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 18, 2023, 01:11 PM IST
नारायण-सूधा मूर्तींनी तिरुपती बालाजी चरणी दान केले सोन्याचे कासव व शंख; 'या' दानाला किती महत्त्व? title=
Infosys Narayana Murthy, Sudha Murty donate gold conch, tortoise idol to Tirupati temple

Narayana Sudha Murty Donate Gold Conch: देशातील दिग्गज आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसचे सर्वेसर्वा एन नारायण मूर्ती (Narayana Murthy) आणि त्यांची पत्नी सुधा मूर्ती (SudhaMurthy) यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी तिरुपती बालाजीच्या (Tirupati Balaji Temple) चरणी सोन्यचा शंख आणि सोन्याचे कासव दान केले आहे. या दोघांचे वजन जवळपास 2 किलो इतके आहे. नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती ये दोघेही यापूर्वी तिरुपती बालाजी मंदिराच्या संस्थेचे सदस्य होते. तिरुमाला तिरुपती देवस्थानमक ट्रस्टचे सदस्य ईओ धर्म रेड्डी यांच्या हातात सोन्याचा शंख आणि कासवाची मूर्ती सोपवली आहे. अनमोल असलेल्या या वस्तूंचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Narayana Murthy Sudha Murty Donate Gold At Tirupati Balaji)

मंदिरात असलेल्या रंगनायकुला मंडपात दोघांनी शंख आणि कासवाची मूर्ती दान केली आहे. अलीकडेच नारायण मूर्ती यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ते नारायण मूर्ती हे मी भगवतगीतेमुळं मला प्रेरणा मिळते, असं म्हणत आहेत. तर, भारताचे महाकाव्य महाभारताबाबतही वक्तव्य केलं आहे. महाभारतातील एका पात्राच्या चरित्राने मला प्रेरणा मिळाली आहे. आणि ते पात्र म्हणजे कर्ण आहे. त्याचे कारण म्हणजे कर्णाची उदारता. त्याचमुळं मी आज यशस्वी झालो आहे. 

मूर्ति दाम्पत्यांनी जो सोन्याचा शंख आणि कासवाची मूर्ती दान केली आहे ती खूपच खास आहे. त्यावर दोन्ही बाजूंनी डिझाइन करण्यात आलं आहे. या दोन्ही वस्तूंचा वापर स्वामी अम्मावर यांच्या अभिषेकासाठी करण्यात येतो. मूर्ती दाम्पत्याने केलेल्या या दानाला भूरि दान असंही म्हणतात. मीडिया रिपोर्टनुसार, सध्या बाजारात सोन्याची किंमत 10 ग्रामसाठी 60 हजार रुपये इतकी आहे. दान केलेल्या या सोन्याचा शंख आणि कासवाची मूर्ती जवळपास 2 किलो इतकी आहे. त्यामुळं याची किंमत याआघडीला 1.50 कोटी इतकी आहे. 

तिरुमाला तिरुपती बालाजी मंदिरात प्राचीन काळापासून दान देण्याची प्रथा आहे. या मंदिरात मोठे नेते, अभिनेता, उद्योगपती आणि कलाकारांसह सर्वसामान्य व्यक्तीही दर्शनासाठी येतात. असं म्हणतात की भगवान व्यंकटेशाला दान दिल्यास भक्तांच्या अडचणी दूर होतात. त्यामुळं इथे दान देण्याला अधिक महत्त्व आहे.