Earth Secrets : विश्वाची उत्पत्ती झाल्या क्षणापासून कैक हालचालींनंतर सध्या दिसणाऱ्या जगाची, जीवसृष्टीची निर्मिती झाली. कोट्यवधी वर्षांपासून सुरू असणारी ही बदलांची प्रक्रिया अद्यापही सुरूच असून, त्याचीच काहीशी रंजक आणि डोळे विस्फारण्यास भाग पाडणारी माहिती नुकतीच समोर आली आहे. एका निरीक्षणानुसार पृथ्वीच्या अंतर्गत भागांमध्ये होणाऱ्या हालचालींमुळे काही खंडांच्या मध्यभागी असणाऱ्या क्षेत्राला नैसर्गिकरित्या उंची प्राप्त झाली आहे. अर्थात हे भाग नैसर्गिक कृतींमुळं उठताना दिसत आहेत.
सहसा पृथ्वीच्या अंतर्गत भागातील या हालचालींमुळं पठारांची निर्मिती होते. ज्यावेळी एखादा उपखंड भंग पावतो तेव्हा त्याच्या किनाऱ्यालगत लहानमोठी पर्वतं निर्माण होण्यास सुरुवात होते. हे सर्व एका लाटेमुळं होत असून, ही लाट धीम्या गतीनं पृथ्वीच्या आत जाते आणि पठारं निर्माण होतात.
इंग्लंडच्या साऊथहॅम्पटन युनिवर्सिटीतील जिओ सायंटीस्ट थॉमस जरनॉन यांच्या माहितीनुसार उपखंडांमध्ये पडणाऱ्या भेगांमुळं पर्वतांची उंची आणखी वाढते. उदाहरणार्थ आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅली आणि इथिओपियाई पठार. ही रचना तयार होण्यासाठी साधारण 1 ते 10 कोटी इतकी वर्ष लागतात. 7 ऑगस्ट 2024 रोजी Nature जर्नलमध्ये यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती.
जरनॉननं या स्टडीसाठी पृथ्वीचा अखेरचा खंड भंग पावल्यानंतर तयार झालेल्या भिंतीची पडताळणी केली. यापैकी एक भिंत भारतातील असून, त्याच भागाला पश्चिम घाट (Western Ghats) म्हणून ओळखलं जातं. या भिंतीतं अंतर साधारण 2000 किमी असून, याहून सर्वात मोठी भिंत ब्राझिलमध्ये असून, हायलँड प्लॅट्यू असं या क्षेत्राचं नाव. या भिंतीचं अंतर आहे 3000 किमी. त्याहीपेक्षा अधिक अंतराची म्हणजेच 6000 किमी अंतराची भिंत दक्षिण आफ्रिकेमध्ये असून त्याचं नाव आहे सेंट्रल प्लॅट्यू. सोप्या शब्दांत सांगावं तर, या पठारांच्या खालच्या भागाची उंची कैक किलोमीटर अंतरानं वर आली असून, त्यामागचं कारण आहे पृथ्वीच्या विविध आवरणांमध्ये सुरू असणाऱ्या हालचाली.
हिमालय पर्वताहून पश्चिम घाटाचं वय अधिक असल्याचं सांगितलं जातं. ही पर्वतरांग कमालीच्या जैवविविधतेनं नटली असून, या भागामध्ये असणाऱ्या उंचच उंच पर्वतरांगा भारतातील वर्षा पर्यटनाला वाव देतात. या पश्चिम घाट क्षेत्रामध्ये कमीत कमी 325 जीवजंतू, पक्षी, उभयचर, सर्प आणि जलचरांच्या प्रजाती आढळतात.