किती मायलेज देतं भारतीय रेल्वेचं इंजिन? जाणून विश्वासच बसणार नाही

तुम्हाला माहितीये का?

Updated: Dec 23, 2021, 01:04 PM IST
किती मायलेज देतं भारतीय रेल्वेचं इंजिन? जाणून विश्वासच बसणार नाही  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे (Indian Railway) हे जगातील चौथ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वे जाळं आहे. प्रत्येक वर्गातील, स्तरातील व्यक्तीला रेल्वेनं प्रवास करण्याची मुभा आहे. सध्या बरीच प्रगती झालेली असली, तरीही भारतीय रेल्वेचं इंजिन मुळात वीज, डीझेल आणि वाफेवर चालत आलं आहे. 

सध्या वाफेवर चालणारं इंजिन अगदी क्वचित प्रसंगीच रुळांवर येतं. पण, डिझेलवर चालणाऱ्या अनेक रेल्वे आहेत. तुम्हाला माहितीये का, या रेल्वे किती मायलेज देतात? 

मायलेज जाणून घेण्यापूर्वी हेसुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं की, रेल्वेच्या इंधनाचा टँक किती क्षमतेचा असतो. 

तर, डिझेल इंजिनाच्या आधारे इंधनाच्या टाकीची तीन टप्प्यात विभागणी करण्यात आली आहे. 

5000 लीटर, 5500 लीटर आणि 6000 लीटर अशा क्षमतेत या इंधन टाक्या आहेत. इंजिनाची सरासरी ही प्रतीकिलोमीटरच्या अंदाजानंच काढली जाते. 

डिझेल इंजिन असणाऱ्या 12 डब्यांच्या पँसेंजर गाडीबाबत सांगावं तर, ही ट्रेन 6 लीटर प्रतिकिमी मायलेज देते. 

तर, 24 डब्यांची एक्स्प्रेस रेल्वेगाडीसुद्धा 6 लीटर प्रतिकिमी इतकंच मायलेज देते. 

12 डब्यांची एक्स्प्रेस रेल्वे 4.50 लीटर प्रतिकिमी इतकं मायलेज देते. 

पॅसेंजर आणि एक्स्प्रेसमध्ये फरक यासाठी असतो, कारण पँसेंजर रेल्वे ही सर्व स्थानकांवर थांबत जाते. परिणामी त्यामध्ये ब्रेक आणि अॅक्सिलेटरचा जास्त वापर केला जातो. 

तुलनेने एक्स्प्रेस रेल्वेला कमी थांबे असतात. ज्यामुळं त्यामध्ये ब्रेक आणि अॅक्सिलेटरचा वापरही कमीच होतो. 

मालगाडीबाबत सांगावं तर, डब्यांची संख्या आणि रेल्वेनं नेल्या जाणाऱ्या सामानाच्या आधारे मायलेज काढलं जातं. 

ज्या मालगाडीवर सामानाचा भार जास्त आहे तिचं मायलेज हे कमीच असतं. 

मालगाड़ी के लोड पर डिपेंड होता है माइलेज

तुम्ही आणखी एक बाब पाहिली असेल, की स्थानकावर रेल्वे कितीही वेळ उभी राहिली तरीही तिचं इंजिन बंद होत नाही. 

यामागेही एक मोठं कारण आहे. डिझेलचं इंजिन बंद केल्यास ब्रेक पाईपचं प्रेशरही कमी होतं. ते पुर्वपदावर येण्यास तितकाच वेळ लागतो. 

हा वेळ अंदाजे 20 ते 25 मिनिटे इतका असतो. ज्यामुळं इंजिन बंद करण्याऐवजी सुरुच ठेवलं जातं.