मसूद अजहरने बदलली कोअर टीम, नातेवाईकांना संघटनेतून हटवले- सूत्र

त्याने आपल्या कोअर टीममधून नातेवाईकांना हटवल्याची माहीती समोर येत आहे. 

Updated: Mar 1, 2019, 07:02 PM IST
मसूद अजहरने बदलली कोअर टीम, नातेवाईकांना संघटनेतून हटवले- सूत्र  title=

नवी दिल्ली : दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर आपल्या ताब्यात असल्याची कबूल पाकिस्तानने दिली आहे. पण यापेक्षाही महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर जैश ए मोहम्मदला आपली कोअर टीम बदलावी लागली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मसूद अजहरने आपल्या कोअर टीममध्ये मोठा बदल केला आहे. त्याने आपल्या कोअर टीममधून नातेवाईकांना हटवल्याची माहीती समोर येत आहे. 

मौलाना मसूद अझहरला १९९४ मध्ये अझहरला मध्ये गजाआड करण्यात आलं होतं. त्याची सुटका करण्यासाठी त्याच्याच साथीदारांनी २४ डिसेंबर १९९९ला इंडियन एअरलाईन्सच्या IC 814 या विमानाचं अपहरण केलं होतं. अपहरण करून हे विमान अफगाणिस्तानात कंधारमध्ये नेण्यात आलं. विमानात असणाऱ्या सर्व प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी म्हणून भारताकडून एकूण ३ दहशतवाद्यांना सोडण्यात. त्यात मसूद अझहरचाही समावेश होता. 

होय, आमच्या तळांवर हवाई हल्ले झालेत; मसूद अजहरची कबुली

इंडियन एअरफोर्सने 26 फेब्रुवारीला पीओकेच्या बालाकोटमध्ये जैश ए मोहम्मदच्या कॅंम्पवर हल्ला केला. यामध्ये 300 हून जास्तजण मारले गेल्याचे वृत्त होते. यासोबतच मसूद अजहरचा भाऊ आणि मसूदचा जावई देखील मारला केल्याचे सांगितले गेले. बालाकोटमध्ये हवाई हल्ले झाल्याचे मान्य केले आहे. पण त्यामुळे आपल्या संघटनेचे फारसे नुकसान झालेले नाही. त्याचबरोबर आपल्या संघटनेच्या सदस्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांनाही कसलाही धक्का बसलेला नाही, असा दावा मसूद अजहर याने केला आहे. भारताच्या या हल्ल्यानंतर मसूद पाकिस्तानने अजहरला दुसरीकडे हलवल्याचे सांगण्यात येत आहे. 

दहशतवादी मसूद अजहर याच्याबद्दल गप्पच राहणं पसंत केलं होतं. परंतु, आता मात्र पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी मसूद अजहर पाकिस्तानात असल्याची कबुली दिलीय. इतकंच नाही, तर मसूद खूप अस्वस्थ असल्याचे सीएनएनशी बोलताना कुरेशी म्हणाले होते.

कोण आहे हा मसूद अझहर?

जैश- ए- मोहम्मद Jaish e Mohammed या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर masood azhar याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. संयुक्त राष्ट्रात याविषयीच्या प्रस्तावाला एकमताने मंजूरी मिळण्याची चिन्हं सध्या पाहायला मिळत आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास तो भारतीय परराष्ट्र धोरणाचा विजय असेल असं म्हटलं जात आहे.  pulwama attack पुलवामा हल्ल्य़ानंतर अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्य़ात यावं यासाठीच्या हालचालींना वेग आला होता. फक्त पुलवामाच नव्हे तर, पठाणकोटसोबतच इतरही काही मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा कट रचल्याचा आरोप अझहरवर आहे. ज्या धर्तीवर आता हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.