अभिनंदन भारतात पोहोचले, आता पुढे काय होणार ?

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायु सेनेचे एअर कमांडर अभिनंदन नुकतेच भारतात पोहोचले आहेत.

Pravin Dabholkar | Updated: Mar 1, 2019, 05:53 PM IST
अभिनंदन भारतात पोहोचले, आता पुढे काय होणार ?  title=

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायु सेनेचे एअर कमांडर अभिनंदन नुकतेच भारतात पोहोचले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काल यासंदर्भात माहिती दिली होती. पाकिस्तानी विमानांना पिटाळून लावताना अभिनंदन पाकिस्तान हद्दीत पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय दबाव तसेच जिनिव्हा करारानुसार त्यांनी पाकिस्तानला पुन्हा भारताच्या स्वाधीन केले. पण भारतात पोहोचल्यानंतर अभिनंदन यांना काही प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. अभिनंदन अमृतसरहून दिल्लीला जाणार आहेत.

LIVE: भारताचे 'वीर' कमांडर अभिनंदन यांना भारताकडे सोपवलं

सर्वात आधी इंटरनॅशनल रेड क्रॉस सोसायटी अभिनंदन यांनी स्वत: सोबत घेऊन जाईल आणि त्यांची पूर्ण चौकशी करेल. त्यांना कोणत्या प्रकारचा शारिरीक, मानसिक छळ झाला का ? याबद्दल विचारणा होईल. असे असल्यास जिनिव्हा करारानुसार याची चौकशी होऊ शकते. त्यानंतर अभिनंदन यांना भारतीय वायुसेनेकडे सुपूर्द करण्यात येईल. 

भारतात आल्यानंतर वायु सेनेची वैद्यकीय टीम पुन्हा त्यांची शंभर टक्के तपासणी करेल. आता पर्यंत यासाठी त्यांचे विशेषज्ञ देखील कामाला लागले असतील. यानंतर विंग कमांडर अभिनंदन यांच्यासोबत बोलणी होती. इंटेलिजस डीब्रीफिंग होईल. तुमच्या सोबत काय झाले? कसे झाले? याची सखोल चौकशी होईल. 
पाकिस्तानात तुमच्याशी कसा व्यवहार झाला. त्यांनी काय विचारले ? काय बोलणी झाली ? अशी कार्यवाही होईल. यानंतर सरकारला रिपोर्ट सादर केला जाईल. जर यामध्ये काही आपत्ती जनक वाटले तर आंतरराष्ट्रीय पातळीवर हे प्रकरण जाऊ शकते.

चाचण्यांचे आव्हान 

पाकिस्ताननं अभिनंदला भारताकडे सोपवलं

संपूर्ण देशात अभिनंदन यांच्या घरवापसीचा आनंद साजरा केला जात आहे. पण भारतात परतल्यानंतर पुढचे काही दिवस अभिनंदन यांच्यासाठी आव्हानाचे असणार आहेत. त्यांना काही चाचण्यांना सामोरे जावे लागणार आहे. यामध्ये अशी पण एक चाचणी असेल जी अयशस्वी झाल्यास त्यांना नोकरी देखील गमवावी लागू शकते. पण अभिनंदन यांनी आपल्या तल्लख बुद्धीमत्तेचा नजराणा सीमेपलीकडून केव्हाच दिला आहे. त्यामुळे या चाचण्याही ते यशस्वी पार करतील यात काही शंका नाही. 

भारतीय वायुसेनेच्या नियमांनुसार त्यांना काही कडक चाचण्यांमधून जावे लागेल. मेडीकल टेस्ट, फिटनेस टेस्ट, मनोवैज्ञानिक आणि स्कॅनिंग चाचण्या याचाच एक भाग आहे. पाकिस्तानी सैन्याने अभिनंदन यांच्यावर मानसिक परिणाम होईल अशी काही कार्यवाही केली आहे का ? याची पडताळणी देखील यामध्ये होईल. त्यामुळे हे ऐकायला जरी कटू वाटत असले तरी अभिनंदन यांना या चाचण्या पार पाडाव्या लागतील.