Investment Idea | एफडी, आरडी करून फायदा नसेल होत तर, हे म्युच्युअल फंड देतील चांगला रिटर्न

FD - RD चा व्याजदर सध्या खूपच कमी झाला आहे. अशा स्थितीत चांगला परताव परंतु तेवढीच सुरक्षित गुंतवणूक करायची असेल, तर आम्ही सूचवतोय हे Gilt Mutual Funds वाचा सविस्तर

Updated: Jul 7, 2021, 02:17 PM IST
Investment Idea | एफडी, आरडी करून फायदा नसेल होत तर, हे म्युच्युअल फंड देतील चांगला रिटर्न  title=

Mutual Funds : भारतात बहुतांश गुंतवणूकदार पैसे तेथे लावू इच्छिता जेथे त्यांची गुंतवणूक सुरक्षित राहिल, त्यामुळे फिक्स डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट हे यातील सर्वात पॉप्युलर पर्याय आहेत. येथे सर्वात विशेष गोष्ट म्हणजे गुंतवणूकदारांचा पैसा सेफ राहतो. परंतु, यातील नकारात्मक गोष्ट अशी की, या पर्यायांमध्ये आता परतावा अतिशय कमी मिळत आहे. मागील काही वर्षांमध्ये व्याजदरांमध्ये कपात झाली आहे. त्यामुळे गिल्ट म्युच्युअल फंड हा एक पर्याय गुंतवणूकदारांसमोर आहे. जेथे गुंतवणूकदारांचा पैसा सरकारी बॉंड किंवा सरकारी रोख्यांध्ये लावला जातो.

गिल्ट फंड वेगवेगळ्या अवधीमध्ये मॅच्युअर होणाऱ्या सरकारी बॉंड किंवा 10 वर्षाच्या मॅच्युरिटी असलेल्या सरकारी रोख्यांमध्ये गुंतवला जातो. यामुळे इतर डेट फंड योजनांच्या प्रमाणात ते सुरक्षित असतं. सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक केल्याने डिफॉल्टची भिती राहत नाही. 

चांगला परतावा देणारे फंड
IDFC Govt Securities Constant फंडने गेल्या 3 वर्षात 12 आणि 5 वर्षात 10 टक्के परतावा दिला आहे.

ICICI Pru Constant Maturity Gilt फंडसुद्धा गेल्या 3 वर्षात 12 टक्के तर 5 वर्षात 10 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

Nippon India Gilt Securities  फंडने गेल्या 3 वर्षात 11 टक्के तर 5 वर्षात साधारण 9.5 टक्के परतावा दिला आहे.

SBI Magnum Gilt फंडमध्ये गेल्या 3 वर्षात 11 टक्के आणि 5 वर्षात 9.5 टक्के परतावा दिला आहे.

SBI Magnum Constant Maturity फंडने गेल्या 3 वर्षात 11 टक्के तर गेल्या 5 वर्षात साधारण 10 टक्के रिटर्न दिला आहे.