Investment Tips : छोटी गुंतवणूक, घसघशीत परतावा; 15 वर्षांसाठी दररोज 100 रुपये करा Invest, कुटुंबीय म्हणतील- व्वा भारीच आयडिया

Business News: छोट्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. मात्र, त्यासाठी तसेच नियोजन हवे, तर हे सहज शक्य होऊ शकते. यासाठी आम्ही तुम्हाला गुंतवणूक करण्याबाबत काही टीप्स देत आहोत. जर आपण म्युच्युअल फंडाच्या परताव्याबद्दल सांगायचे म्हटले तर यात गुंतवणूक करणे जास्त जोखमीचे नसते. त्यामुळे यामधील गुंतवणूक चांगली असते. तसेच परतावाही चांगला मिळतो. अशा अनेक योजना आहेत ज्यांनी 15 वर्षांत 15 टक्के परतावा दिला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की संपूर्ण रक्कम कोणत्याही एका फंडात गुंतवू नका. जर तुम्ही  3000 रुपये गुंतवत असाल, तर 1000 रुपये तीन वेगवेगळ्या फंडांमध्ये गुंतले पाहिजे.

Updated: Nov 11, 2022, 11:56 AM IST
Investment Tips : छोटी गुंतवणूक, घसघशीत परतावा; 15 वर्षांसाठी दररोज 100 रुपये करा Invest, कुटुंबीय म्हणतील- व्वा भारीच आयडिया title=

Mutual Funds SIP Investments : सध्या महागाईने अनेक जण त्रस्त झाले आहे. हातात पैसा नसल्याने त्यात अधिक भर पडत आहे. तुम्ही छोटी गुंतवणूक करुन चांगला परतावा मिळवू शकता. मात्र, वाढत्या महागाई वाढीनुसार बँकांच्या बचत योजना तशा फायद्याच्या ठरत नाहीत. व्याजदरही वाढत आहेत आणि बचत खाती, एफडी आणि बँकांच्या मुदत ठेव खात्यांवर मिळणारे व्याज कमी मिळत आहे. त्यामुळे अशा स्थितीत पैसे गुंतवायचे कुठे, हा प्रश्न आपल्या अनेकांच्या मनात निर्माण होतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्हाला कमी भांडवलात जास्त नफा मिळवायचा असेल तर म्युच्युअल फंड तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरु शकतो. 

छोटी गुंतवणूक, घसघशीत परतावा

बेरोजगारीत दिवसागणिक भर पडत आहे. रोजगाराच्या संधी वाढल्या असल्या तरी महागाईनुसार वेतन दिले जात नाही. त्यामुळे बचतीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे जर तुम्ही दररोज 100 रुपये गुंतवले तर तुम्हाला एका महिन्यात 3000 रुपये मिळतील. हे पैसे तुम्ही चांगल्या म्युच्युअल फंड योजनेच्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये (SIP) टाकू शकता. ही गुंतवणूक तुम्हाला 15 वर्षांसाठी करावी लागेल. सध्या बाजारात असे अनेक म्युच्युअल फंड आहेत, ज्यांनी 15 वर्षांत 15 टक्के परतावा दिला आहे. जर तुम्हाला समान परतावा मिळाला तर 15 वर्षांनंतर तुमच्याकडे 20 लाख रुपयांचा निधी असेल. 

रक्कम वाढवण्याचे सूत्र गणित आहे?

जर तुम्ही म्युच्युअल फंड योजनेत दर महिन्याला 3000 रुपये गुंतवलेत, तेही 15 वर्षांसाठी, तर तुम्ही हे लक्ष्य सहज साध्य करु शकता. जर तुम्ही कॅलक्युलेशन केले तर 15 वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक 5.40 लाख रुपये होईल. जर फंड मॅनेजरची कामगिरी चांगली असेल तर दीड दशकानंतर तुमच्या एसआयपीचे मूल्य 20 लाख रुपये होईल. म्हणजेच तुम्हाला 14.60 लाख रुपयांचा परतावा मिळेल. यामध्ये तुम्हाला कंपाउंडिंगचा फायदाही मिळेल.

SIP देतो चांगला परतावा 

आजच्या युगात सामान्य गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एसआयपी. या प्रकारच्या गुंतवणुकीमुळे चांगली परतावा मिळतो आणि तोट्याचा धोका कमी होतो. तुम्हाला उत्तम परतावा देखील मिळतो, असे तज्ज्ञ सांगतात.

 म्युच्युअल फंडाची उत्कृष्ट कामगिरी

जर आपण म्युच्युअल फंडाच्या परताव्याबद्दल बोललो तर अशा अनेक योजना आहेत ज्यांनी 15 वर्षांत 15 टक्के परतावा दिला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की संपूर्ण रक्कम कोणत्याही एका फंडात गुंतवू नका. जर तुम्ही 3000 रुपये गुंतवत असाल, तर 1000 रुपये तीन वेगवेगळ्या फंडांमध्ये विभाजित करा आणि गुंतवणूक करा.

जर तुम्ही ठरवले असेल की तुम्ही SIP मध्ये 15 वर्षांसाठी 3000 रुपयांची गुंतवणूक कराल, तर तुम्हाला कधीतरी वैयक्तिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यावेळी तुम्ही गुंतवणूक थांबवू शकता. यावर कोणताही दंड नाही. तुमची परिस्थिती सुधारल्यावर तुम्ही पुन्हा गुंतवणूक सुरु करू शकता. 

(Disclaimer: कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ZEE 24 TAAS तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही.)