श्रीनगर : इरम हबीब ३० वर्षाची वैमानिक (पायलट) श्रीनगर शहरातील पहिली महिला मुस्लीम पायलट ठरणार आहे. मात्र इरम हबीब या श्रीनगर शहरातील पहिल्या महिला पायलट असल्या तरी, यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या पहिल्या महिला मुस्लिम पायलट या, सामी आरा ठरल्या आहेत. सामी आरा उत्तर काश्मीरमधील बांडीपोरा जिल्ह्यातील सुंबल तालुक्याच्या आहेत.
दुसरीकडे इरम हबीब या काश्मीरमधल्या अत्यंत धार्मिक मुस्लीम वातावरणातील तरूणीनं वैमानिक होणं ही अत्यंत दुर्मिळ बाब असून त्यामुळे इरमची कामगिरी कौतुकाचा विषय झाली आहे. बालपणापासूनच इरमने वैमानिक होण्याचं स्वप्न बघितलं होतं, त्यासाठी तिनं फॉरेस्ट्री या विषयात डॉक्टरेट करण्याची आकांक्षा बाजूला ठेवली आणि पायलट होणं निवडले.
पायलट होणारी ती श्रीनगर शहराची पहिलीच महिला आहे. तिने २०१६ मध्ये अमेरिकेतून हवाई प्रशिक्षण पूर्ण केले होते. ती इंडिगो हवाई कंपनीमध्ये पायलट म्हणून काम करणार आहे. इरमने २०१६मध्ये अमेरिकेतून पायलटचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तिला गोएअर आणि इंडिगोकडून नोकरीची ऑफर मिळाली. तिने इंडिगोची ऑफर स्वीकारली आहे.
Our own Iram Habib, first lady pilot from Srinagar city. Proud. Proud. Proud...! pic.twitter.com/Cf0JvsDdKM
— Adeeba (@AdeebaJMIU) August 28, 2018
आई-वडिलांच्या सांगण्यावरुन तिने पीएचडीसाठी प्रवेश घेतला. मात्र, तिचे मन त्यात रमले नाही. तिने पीएचडी अर्ध्यावर सोडून अमेरिकेत फ्लाईंग स्कूलला प्रवेश घेतला. शेवटी २०१६मध्ये तिला व्यापारी पायलट लायसेन्स मिळाले.
डेहराडूनच्या शेर-ए-कश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठातून तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिने पीएचडी करून सरकारी नोकरी करावी, अशी तिच्या कुटुंबीयांची इच्छा होती. मात्र तिने आपले स्वप्न आणि जिद्द सोडली नाही. तिला वडिलांकडून प्रेरणा मिळाली, असे ती सांगते. वडिलांनी मला नेहमीच पाठबळ दिले, असेही ती आवर्जून सांगते.
#Downtown_pilot_girl_takes_to_skies#IRAM_HABIB. (30), a resident of downtown #Srinagar city, is the first and youngest woman from Srinagar to fly an aircraft. #congrats. @dr_piyushsingla @listenshahid @AdeebaJMIU @KangriCarrier @SyedAbidShah @jandkgovernor @DrSyedSehrish pic.twitter.com/VSKCIns1O0
— Hadi Hidayat official (@hadi_hidayat_1) August 28, 2018