IRCTC DOWN: IRCTC ची वेबसाइट पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. IRCTC वर पुढील एक तासांसाठी तिकिट बुकिंग करताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळं प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तात्काळ तिकिटांचे बुकिंग करायचे असल्यास तुम्हाला अडचणी येऊ शकतात. कारण तात्काळ तिकिट बुकिंग करतानाच वेबसाइट ठप्प झाली असल्याची माहिती आहे.
IRCTCने जारी केलेल्या पत्रकानुसार, वेबसाइटवर तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने साइट ठप्प झाली आहे. तांत्रिक अडचण सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळं पुढील 1 तासांसाठी कोणत्याही प्रकारचे बुकिंग होऊ शकत नाही. IRCTCची सर्व्हिस डाउन झाल्यानंतर तात्काळ तिकिट मिळवण्यासाठी प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तसंच, सोशल मीडियावरदेखील लोक नाराजी जाहीर करत आहेत. तसंच, IRCTCला टॅग करत लोक सवाल करत आहेत. हा सायबर अटॅक तर नाही , अशी शंकादेखील लोक उपस्थित करत आहेत.
IRCTC च्या वेबसाइटच मेंटेनेंसचं काम 11 नंतर केले जाते. मात्र, आज त्या आधीच केले गेले. यामुळं प्रवाशांना सायबर अटॅक असल्याची शंका व्यक्त केली जाते. कारण 10 वाजल्यापासून एसी तात्काळसाठी तिकिट बुकिंग होते. तर, साधारण 11 वाजल्यापासून एसी बुकिंग होती. IRCTC ची सर्व्हिस डाउन झाल्यामुळं दोन्ही बुकिंग करता येत नाहीयेत. त्यामुळं प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतोय. तर, ट्विटरवर लोकांनी त्यांच्या समस्या मांडल्या आहेत.
दरम्यान, आयआरसीटीसीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. IRCTC च्या वेबसाइट वर लॉगइन केल्यावर Downtime असा मेसेज येत आहे. तसंच, प्रवाशांना तिकिट कॅन्सलेशन आणि TDR फाइल करायचं असेल तर कस्टमर केअरच्या नंबरवर फोन किंवा ईमेल करण्यासाठी सांगितलं जात आहे. आयआरसीटीच्या सर्व्हरचे मेटेंनस रात्री होते. मात्र आज सकाळीच IRCTC चे सर्व्हर डाउन झाले. त्यामुळं सोशल मीडियवर लोकांच्या तक्रारीचा पाढा सुरू आहे. लोक सोशल मीडियावर त्यांची नाराजी व्यक्त करत आहेत.