ISRO : 36 उपग्रहांसह इस्रोच्या सर्वात वजनदार रॉकेट LVM3 चं यशस्वी प्रक्षेपण

ISRO Oneweb Satellites:   दिवाळीच्या मुहूर्तावर इस्रोने पुन्हा इतिहास रचला आहे.  इस्रोकडून भारतीयांना दिवाळीची मोठी भेट देण्यात आली आहे.

Updated: Oct 23, 2022, 07:44 AM IST
ISRO : 36 उपग्रहांसह इस्रोच्या सर्वात वजनदार रॉकेट LVM3 चं यशस्वी प्रक्षेपण title=
Isro launches 36 OneWeb satellites video nmp

ISRO Satellites Launching:  दिवाळीच्या (Diwali 2022) मुहूर्तावर इस्रोने पुन्हा इतिहास रचला आहे.  इस्रोकडून भारतीयांना दिवाळीची मोठी भेट देण्यात आली आहे. सर्वात वजनदार रॉकेटचे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण केलं. OneWeb च्या 36 रॉकेट प्रक्षेपणाच्या या मिशनसाठी, ISRO ने आपले सर्वात वजनदार रॉकेट 'LVM-3' म्हणजेच लाँच व्हेईकल मार्क 3 आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटामधून मध्यरात्री 12:07 वाजता प्रक्षेपित केले.

इस्रो पुन्हा रचणार इतिहास 

इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ म्हणाले की, इस्रोच्या रॉकेट LVM-3 ने एका खाजगी कम्युनिकेशन फर्म वनवेबचे 36 उपग्रह वाहून नेले. पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत LVM-3 द्वारे 36 OneWeb उपग्रहांचा आणखी एक संच प्रक्षेपित केला जाईल. 36 पैकी 16 उपग्रह यशस्वीरित्या वेगळे करण्यात आलं असून उर्वरित 20 उपग्रह वेगळे केले जातील. (Isro launches 36 OneWeb satellites video nmp)

108 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा करार

ब्रिटनसोबत झालेल्या 108 उपग्रह करारांतर्गत GSLV मार्क-3 पहिल्या टप्प्यात 36 उपग्रहांसह प्रक्षेपित करण्यात आले. 36 उपग्रह निव्वळ दळणवळणासाठी आहेत. या वर्षी पीएसएलव्ही आणि एसएलव्ही रॉकेटची चाचणी घेण्यात येणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (NSIL), अंतराळ विभागाच्या अंतर्गत असलेल्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाने यापूर्वी भारती-समर्थित OneWeb या लो अर्थ ऑर्बिट (LEO) उपग्रह संप्रेषण कंपनीसोबत दोन प्रक्षेपण सेवा करारांवर स्वाक्षरी केली होती.