गोरखपूरची हार ही योगी आदित्यनाथांंची नाही तर मठाची आहे - संजय निषाद

गोरखपूर -फूलपूर मध्ये भाजपाचा पोटनिवडनूकीमध्ये धुव्वा उडाला आहे. गोरखपूरमध्ये 27 वर्षांनंतर बीजेपीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 

Updated: Mar 15, 2018, 07:47 PM IST
गोरखपूरची हार ही योगी आदित्यनाथांंची नाही तर मठाची आहे - संजय निषाद  title=

उत्तरपप्रदेश : गोरखपूर -फूलपूर मध्ये भाजपाचा पोटनिवडनूकीमध्ये धुव्वा उडाला आहे. गोरखपूरमध्ये 27 वर्षांनंतर बीजेपीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 

योगी आदित्यनाथांना धक्का 

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजपाच्या या पराभवानंतर त्यांचे सारे कार्यक्रम रद्द केले आहेत. तसेच लवकरच या पराभवाची नेमकी कारणं काय होती ? याबाबत बैठक बोलावली जाणार आहे.   

विजेत्या उमेदवाराच्या वडिलांची प्रतिक्रिया 

प्रवीण निषाद या उमेदवाराने भजपाच्या उपेंद्र दत्त शुक्ला यांच्यावर विजय मिळवला. या विजयानंतर प्रतिक्रिया देताना प्रवीण निषाद यांच्या वडिलांनी हा पराभव योगी आदित्यनाथांचा नसल्याचं म्हटलं आहे. 

गोरखपूरमधील हा पराभव योगी आदित्यनाथांचा नसून गोरखनाथ मठाचा आहे. असे मत संजय निषाद यांनी व्यक्त केले आहे.नागरिकांनी भाजपा सरकारच्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या विरोधात मतदान केले आहे. सोबतच हा भाजपाचा पराभव नरेंद्र मोदींचा आहे. असे मत त्यांनी व्यक्त केलं. 

समाजवादी पार्टीला अनेकांचा पाठींबा 

समाजवादी पार्टीला बसपा, राष्ट्रीय लोकदल, निषाद पार्टी,पीस पार्टी सोबतच अनेकांचा पाठींबा मिळाला. परिणामी भाजपावर मात करायला मदत झाली.  

अतिआत्मविश्वासामुळे गमावली निवडणूक - योगी आदित्यनाथ 

निवडणूकीची घोषणा झाली तेव्हा सपा, बसपा आणि कांग्रेस हे सारे पक्ष वेगवेगळे होते. मात्र निवडणूकांदरम्यान या पक्षांमध्ये सौदेबाजी झाली. त्यांचं एकत्र येणं भाजपा सरकारला समजले नाही. परिणामी अतिआत्मविश्वासामुळे ही पोटनिवणूक गमावल्याचं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. 

फूलपूरचे केशव प्रसाग मौर्य यांनी बसपा अशाप्रकारे समाजवादी पार्टीला मदत करेल याची अपेक्षा नव्हती असे म्हणाले. या शक्यतेचा आम्ही विचार केला नसल्याचं त्यांनी कबुल केलं आहे.  

हा योगी सरकारविरोधी जनादेश : अखिलेश यादव  

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मीडियाला माहिती देताना पोटानिवडणूकीचे निकाल हे नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ सरकारविरोधी जनादेश असल्याचं म्हटलं आहे.