जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल दहशतवाद्यांच्या टार्गेटवर

मुज्जफराबादमध्ये त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्लॅन

Updated: Nov 7, 2019, 10:19 AM IST
जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल दहशतवाद्यांच्या टार्गेटवर title=

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल जी सी मुरमू हे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहेत. मुज्जफराबादमध्ये त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्लॅन आखण्यात आल्याचं गुप्तहेर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीने उघड झालं आहे. जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर पाकिस्तान पेटून उठलंय आणि त्यानूसार मोठ्या हल्ल्यांचा पाकिस्तानकडून कट रचण्यात येत आहे. 

गुजरात कॅडरचे 1985 च्या बॅचचे ते आयएएस अधिकारी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मुरमू राज्याचे प्रधान सचिव होते. भारत सरकारमध्ये अर्थ मंत्रालयामध्ये देखील त्यांनी व्यय सचिव म्हणून काम केलं आहे. व्यय सचिव म्हणजे भारत सरकारच्या संपत्तीवर प्रभारी म्हणून असणं. 

गिरीश चंद्र मुरमू ओडिशाच्या मयूरभंज ज़िल्ह्यातील राहणारे आहेत. त्यांनी राज्यशास्त्रमध्ये मास्टर्स आणि पब्लिक सर्विसेसमध्ये एमबीए केलं आहे.