AAP Leader In ICU: बाथरुममध्ये घसरून पडल्याने AAP चा नेता ICU मध्ये! प्रकृती चिंताजनक असल्याने ऑक्सिजन सपोर्टवर

Jailed AAP Leader On Oxygen Support: आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी हा नेता मागील काही महिन्यांपासून तिहार तुरुंगामध्ये आहे. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 25, 2023, 02:34 PM IST
AAP Leader In ICU: बाथरुममध्ये घसरून पडल्याने AAP चा नेता ICU मध्ये! प्रकृती चिंताजनक असल्याने ऑक्सिजन सपोर्टवर title=
AAP Leader On Oxygen Support

AAP Leader On Oxygen Support: दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना रुग्णालयामध्ये दाखल (Satyendar Jain admitted) करण्यात आलं आहे. मागील अनेक आठवड्यांपासून तिहार तुरुंगात असलेले जैन हे आज सकाळी कोठडीमधील बाथरुममध्ये चक्कर आल्याने पडले. त्यानंतर त्यांना तातडीने डीडीयू रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. जैन यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं आहे. सध्या जैन यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. जैन यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना दुपारच्या सुमारास एलएनजेपी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे. मागील 2 आठवड्यांमध्ये दुसऱ्यांदा जैन यांना प्रकृतीच्या कारणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आयसीयूमध्ये ठेवण्यात आल्याचं आपच्या सुत्रांनी म्हटलं आहे.

पाय आणि खांद्याला दुखापत

अटकेत असताना यापूर्वीही जैन हे कोठडीमधील बाथरुममध्ये पडल्याने त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. यामधून सावरत असतानाच पुन्हा त्यांचा तसाच अपघात झाल्याने त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिहार जेलमधील प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज (25 मे 2023) पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास जैन हे तुरुंगामधील बाथरुममध्ये घसरुन पडले. डॉक्टरांनी जैन यांच्या प्रकृतीची पहाणी केली असून प्रकृती स्थिर असल्याचा दावा तुरुंग प्रशासनाने केला आहे. जैन यांच्या पाठीला, पायाला आणि खांद्याला दुखापत झाल्याचं सांगितलं जात आहे.

शस्त्रक्रीया होणार

तुरुंग प्रशासनाच्या माहितीनुसार, जैन यांच्यावर लवकरच शस्त्रक्रीया होणार आहे. या शस्त्रक्रीयेसंदर्भातील सर्व चाचण्या करण्यात येणार आहेत. जैन यांना मणक्याचा त्रास आहे. सोमवारीच जैन यांना तुरुंग प्रशासनाने मणक्याच्या चाचणीसंदर्भात रुग्णालयात आणलं होतं. 

प्रकृती खालावली

3 दिवसांपूर्वीच सत्येंद्र जैन यांची तब्बेत खालावल्याने सफदरजंग रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं. जैन हे ओळखू येणार नाहीत इतकी त्यांची शरीरयष्टी बदलल्याचं यावेळी दिसून आलं. जैन यांचं वजन 35 किलोंनी कमी झालं आहे. काही आठवड्यांपूर्वीच जैन यांनी आपल्याला तुरुंगामध्ये उदास आणि एकटं वाटतं असं म्हटलं होतं. मानसिक परिस्थिती ठीक नसल्याचे संकेत जैन यांनी दिल्यानंतर तुरुंग प्रशासनाने एका मानसोपचारतज्ज्ञाच्या मदतीने त्यांचं समोपदेशन केलं होतं. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालाव्याने थेट रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर त्यांना पुन्हा कोठडीत हलवण्यात आलं. पण तिथे आज पुन्हा ते बाथरुममध्ये घसरुन पडले.

व्हिडीओमुळे वाद

आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी जैन सध्या तिहारच्या तुरुंगात आहेत. काही महिन्यांपूर्वी त्याचे मसाज घेताने तुरुंगातील व्हिडीओ व्हायरल झाल्याने नव्या वादाला तोंड फुटलं होतं. त्यांना व्हिआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचेही आरोप झाले होते. जैन यांना दिल्ली बाहेरच्या तुरुंगात ठेवावं अशी मागणी भाजपाने केली होती.