कधीपासून लागू होणार जीएसटी , सांगितले जेटलींनी...

30 जूनच्या मध्यरात्रीपासून जीएसटी लागू होणार असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिलीय. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 18, 2017, 10:25 PM IST
 कधीपासून लागू होणार जीएसटी , सांगितले जेटलींनी... title=

नवी दिल्ली : 30 जूनच्या मध्यरात्रीपासून जीएसटी लागू होणार असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिलीय. 

जीएसटी परिषदेची बैठक रविवारी पार पडली. या बैठकीत सरकारी आणि खासगी लॉटरीचे कर निश्चित करण्यात आले. 

राज्य सरकारद्वारे संचालित लॉटरीवर बारा टक्के कर निश्चित करण्यात आलाय. सरकारच्या मान्यताप्राप्त खासगी लॉटरीवर 28 टक्के कर निर्धारित करण्यात आलाय. लॉटरीवरील कराचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत होता. 

काही राज्य लॉटरीवर कमी कर लावण्याच्या बाजूने होते. जीएसटी परिषदेची पुढील बैठक 30 जूनला होणार आहे.