श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या त्राल भागात मंगळवारी पहाटेपासूनच पोलीस आणि सीआरपीएफची दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलंय. त्रालमध्ये दोन-तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. हे दशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित असल्याचं सांगण्यात येतंय. रात्रीपासून सुरू असलेल्या या चकमकीत सेनेनं दोन-तीन दहशतवाद्यांना घेरलंय. त्रालच्या कुपवाडा भागात हे दहशतवादी लपून बसलेत.
सुरक्षा यंत्रणेला सूचना मिळाल्यानंतर तातडीनं सर्च ऑपरेशन सुरू झालं. आपणं सुरक्षा दलाकडून घेरलो गेलोय हे लक्षात येताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर दोन्ही बाजुंनी फायरिंग सुरू आहे.
यापूर्वी, गेल्या बुधवारी दक्षिणी काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात सुरक्षा दलानं जैशच्या दोन दहशतवाद्यांना ठार केलं होतं. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये एक पाकिस्तानी दहशतवाद्याचाही समावेश होता. त्यांच्याकडून हत्यारं आणि स्फोटकं जप्त करण्यात आली होती.