जम्मू-काश्मीर : Dead Bodies Found in Sidhra: जम्मू-काश्मीरमध्ये एकामागून एक घटना घडत आहेत. (Jammu Kashmir News) जम्मूतील सिध्रा येथे राहत्या घरात 6 जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये दोन पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. सर्व मृतदेह शवविच्छेदन आणि ओळखी पटविण्यासाठी पाठवण्यात आले आहेत.
जम्मूतील सिध्रा येथे दोन निवासी घरात सापडलेल्या मृतदेहांच्या शरीरावर गोळ्यांचे कोणतेही निशाण नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मृत्यूचे खरे कारण शोधले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका घरात दोन तर दुसऱ्या घरात चार मृतदेह सापडले आहेत.
सकीना बेगम, त्यांच्या दोन मुली नसीमा अख्तर आणि रुबिना बानो, मुलगा जफर सलीम आणि दोन नातेवाईक नूर-उल-हबीब आणि साजाद अहमद अशी मृतांची नावे आहेत, असे पोलिसांनी सांगितले. सिध्रा येथील कुटुंबीयांच्या घरातून मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात तपासासाठी पाठविण्यात आले आहेत.
J&K | Six members of a family found dead at their residences in Sidra area of Jammu. Details awaited.
Two bodies were found in one house, while four were found in their second house. pic.twitter.com/woHFlOMsW0
— ANI (@ANI) August 17, 2022
याआधी मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील छोटीपोरा भागात एका सफरचंदाच्या बागेत दहशतवाद्यांनी दोन काश्मिरी पंडितांना गोळ्या घातल्या। त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला. सुनील कुमार भट यांचे निधन झाले तर त्याचा भाऊ पिंटू जखमी झाला आहे. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा दलाने कडक पाहारा वाढवला आहे.
|
SA
(20 ov) 117
|
VS |
IND
120/3(15.5 ov)
|
| India beat South Africa by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.