राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी एनडीएकडून हरिवंश यांना उमेदवारी

विरोधी पक्ष देणार दुसरा उमेदवार

Updated: Aug 7, 2018, 09:15 AM IST
राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी एनडीएकडून हरिवंश यांना उमेदवारी  title=

नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी जेडीयूचे नेते हरिवंश यांना एनडीएची उमेदवारी मिळणार आहे. राज्यसभेच्या उपसभापतीची निवड बिनविरोध व्हावी अशी इच्छा काल उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध सभापती व्यैकंय्या नायडू यांनी व्यक्त केली. पण एकमत झालं नाही, येत्या गुरुवारी मतदान घेण्याचा इरादाही नायडूंनी यावेळी जाहीर केला. दरम्यान एनडीएनं दिलेल्या उमेदवाराविरोधात उमेदवार उभा करण्याच्या विरोधकांच्या हालचालींना वेग आला आहे. 

राज्यसभेतले विरोधीपक्ष नेते गुलामनबी आझाद यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत १० पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यात राजद, बसापा, तृणमूल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, द्रमुक आणि तेलगू देसमचे राज्यसभा खासदार सामील झाले. राज्यसभेचं उपसभापती विरोधीपक्षांकडे असावं असं सर्वांचं मत असल्याचं आझाद यांनी बैठकीनंतर सांगितलं आहे. दरम्यान राज्यसभेतलं पक्षीय बलाबल बघता, एनडीएचा उमेदवार निवडून आणायचा असेल, तर सरकारला बिजू जनता दल, तेलंगणा राष्ट्र समिती ,वायएसआर काँग्रेस आणि पीडीपी पक्षांच्या एकूण १९ खासदारांचं समर्थन मिळावं लागणार आहे. आज दिवसभर यासंदर्भात राजकीय घड़ामोडींना वेग येणार आहे.