JEE Mains Result 2023 : जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; जाणून घ्या कुठे आणि कशी पाहाल Marksheet?

JEE Mains 2023 Results: परीक्षा कोणतीही असो, ती दिल्यानंतर परीक्षांचे निकाल हाती येईपर्यंत विद्यार्थ्यांच्या मनात धाकधुक सुरुच असते. त्यातही आपल्या करिअरला वळण देण्याच्या दृष्टीनं एखादी परीक्षा दिली असता निकालाचं दडपण जरा जास्तच असतं. 

Updated: Feb 7, 2023, 10:22 AM IST
 JEE Mains Result 2023 : जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; जाणून घ्या कुठे आणि कशी पाहाल Marksheet?  title=
JEE Mains 2023 Result 2023 session 1 results declared how to check online latest Marathi news

JEE Mains 2023 Results: वर्षभर चिकाटीनं अभ्यास केल्यानंतर आपल्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल म्हणजे एखादी परीक्षा. प्रचंड अभ्यास करत, मेहनत घेत आणि दिवसरात्र एक करत विद्यार्थी एखाद्या परीक्षेची तयारी करातात, परीक्षा देतात आणि मग प्रतीक्षा असते की परीक्षेच्या निकालाची. सध्या इंजिनिअरिंगची तयारी करणाऱ्या आणि JEE Mains 2023 या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली आहे. कारण, या मुख्य परीक्षेच्या पहिल्या सत्राचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. 

National Testing Agency (NTA) च्या वतीनं हा निकाल jeemain.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थी या संकेतस्थळाला भेट देऊन तिथं Login करत परीक्षेचा निकाल पाहू शकणार आहे. यासाठी त्यांनी लॉगईन करताना Application Number आणि जन्मतारखेची पूर्तता करणं अपेक्षित असेल. 

हेसुद्धा वाचा : Sehwag On Adani Hindenburg Issue: अदानी-हिंडनबर्ग वादात सेहवागची उडी; म्हणाला, "गोऱ्यांना भारताची..."

 

निकालासोबतच NTA कडून B.E आणि B.Tech च्या प्रश्नपत्रिकांची अंतिम उत्तरंही देण्यात आली आहेत. त्यामुळं विद्यार्थी त्यांचे निकाल पाहण्यासोबतच अधिकृत संकेतस्थळावर Answer Key सुद्धा पाहू शकतात. 

उत्तरपत्रिका पाहताना लक्षात ठेवा... 

- सर्वप्रथम jeemain.nta.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या 
- आता जेईई मुख्य परीक्षेच्या पहिल्या सत्राचा निकाल पाहण्यासाठीच्या लिंकवर क्लिक करा 
- आता PDF फाईल डाऊनलोड करा आणि अंतिम उत्तर पत्रिका पाहा. 

किती विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा? 

2023 च्या परीक्षांसाठी जवळपास 9 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी पहिल्या सत्रासाठी अर्ज दाखल केले होते. यामध्ये 8.6 लाख विद्यार्थ्यांनी पेपर 1 बीई/बी.टेक) आणि 46 हजार विद्यार्थ्यांनी पेपर 2 (बी. आर्क/बी.प्लॅनिंग) साठी अर्ज केले होते.