Jeevan Akshay Policy | LIC चा शानदार प्लान; एकदाच लावा पैसा आणि शेवटच्या श्वासापर्यंत निश्चिंत रहा

LIC चा शानदार प्लान; एकदाच लावा पैसा आणि शेवटच्या श्वासापर्यंत निश्चिंत रहा

Updated: Jul 1, 2021, 01:39 PM IST
Jeevan Akshay Policy | LIC चा शानदार प्लान; एकदाच लावा पैसा आणि शेवटच्या श्वासापर्यंत निश्चिंत रहा title=

मुंबई : भारतीय जीवन विमा निगम (LIC)ची एक लोकप्रिय स्किम होती ती म्हणजेच जीवन अक्षय पॉलिसी होय. या स्किमला LIC कडून बंद करण्यात आले होते. परंतु ही स्किम पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या पॉलिसीमध्ये एकदाच पैसे द्यावे लागतात. त्यानंतर पॉलिसीधारकाला संपूर्ण आयुष्यभर पेंशन मिळते. नक्की काय विशेषता आहेत या पॉलिसीत वाचा

१ कमाल किती रक्कम गुंतवू शकतो?
जीवन अक्षय पॉलिसी सिंगल प्रीमियम नॉन-लिंक्ड आणि पर्सनल एन्युटी प्लान आहे. या पॉलिसीमध्ये कमाल गुंतवणूकीची कोणतीही मर्यादा नसते. जर तुम्ही १ लाख रुपये गुंतवू शकता तर वार्षिक १२ हजार रुपये तुम्हाला पेंशन मिळू शकते.  तुम्हाला जेवढ्या पेन्शनची गरज असेल तेवढी रक्कम तुम्ही गुंतवू शकता.

२ पॉलिसी कोण घेऊ शकतं?
LIC ची जीवन अक्षय पॉलिसी प्रत्येकजन नाही घेऊ शकत. ही पॉलिसी तेच लोक घेऊ शकतात. ज्यांचे वय  ३५ ते ८५ वर्षे इतके आहे. आपल्याला पॉलिसीची रक्कम कशी हवी यासाठी तुम्हाला LIC १० पर्याय देते. ज्यामधून तुम्हाला तुमच्या आवडीचा पर्याय निवडायचा असतो. 

३  परतावा कसा घ्यावा?
या पेंशनचा परतावा तुम्ही एकूण ४ प्रकारे घेऊ  शकता. वार्षिक पेंशन, सहामाही पेंशन, तिमाही पेंशन आणि मासिक पेंशन होय. बहुतांश लोक दरमहिन्याला पेंशन घेण्याला प्राधान्य देतात.