जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने विचारले, अब्जावधी संपत्ती कुठे खर्च करु?

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या जेफ बेजोस यांनी ट्विटरवर फॉलोअर्सना असा काही प्रश्न विचारला की सगळेच हैराण झाले. 

Updated: Oct 29, 2017, 11:30 AM IST
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने विचारले, अब्जावधी संपत्ती कुठे खर्च करु?  title=

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या जेफ बेजोस यांनी ट्विटरवर फॉलोअर्सना असा काही प्रश्न विचारला की सगळेच हैराण झाले. 

जेफ बेजोस यांनी ट्विटरवर फॉलोअर्सना विचारले की मी माझ्याकडे असलेली अब्जावधी संपत्ती कुठे खर्च करु? या प्रश्नानंतर त्यांच्याकडे उत्तराची भलीमोठी यादीच आली. 

खरतंक जेफ जगातील अशा व्यक्तींपैकी एक आहेत जे आपल्या संपत्तीतील मोठ्या प्रमाणात दान करतात. त्यांनी ट्विट करुन विचारले की मी माझी संपत्ती कशी दान करु? मला लोकांच्या भल्यासाठी काम करायचे आहे. मात्र हे करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी असेल. हे काम मला शॉर्ट टर्ममध्ये करायचे आहे ज्यामुळे गरजवंताना याचा लगेच फायदा मिळेल. मात्र त्याचा परिणाम दीर्घकाळ राहिला पाहिजे. 

सोशल मीडियावर मिळाले ३२,०००हून अधिक उत्तरे
जेफ बेजोस यांनी ट्विटरवर प्रश्न विचारल्यानंतर सोशल मीडियाच्या यूजर्सनीही त्यांना निराश केले नाही. २४ तासांच्या आत तब्बल ३२ हजार उत्तरे त्यांना मिळाली. काहींनी त्यांना लायब्ररीवर पैसे खर्च करण्यास सांगितले तर काहींनी अमेरिकेच्या एलजीबीटीक्यू कम्युनिटीला मदत करण्यास सुचवले. अनेकांनी त्यांना आरोग्य विभागासाठी पैसे देण्यास सुचवले. 

जेफ यांनी स्पेस टेक्नॉलॉजीसारख्या क्षेत्रातही गुंतवणूक केलीये. ब्लू मीडिया रिपोर्टनुसार, जेफ यांच्याकडे साधारण ९०.६ अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे. जेफ आपल्या आई-वडिलांकडून चालवल्या जाणाऱ्या एका संस्थेलाही मदत करतात. तसेच कॅन्सर रिसर्च सेंटरलाही त्यांनी ४० मिलियन डॉलरचे दान केलेय.

अशी केली अॅमॅझॉनची सुरुवातीला
जेफ बेसोज यांनी १९८६मध्ये प्रिन्स्टन युनिर्व्हसिटी येथून पदवीचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर कम्प्युटर सायन्स फिल्डमध्ये काम केले. त्यांनंतर जेफ बेसोज यांनी फिटेल नावाच्या कंपनीसाठी नेटवर्क बनवण्याचे काम सुरु केले आणि १९९४मध्ये न्यूयॉर्कमधून सिएटलपर्यंत प्रवास करत amazon.comची स्थापना केली.