आता 'या' महिलांना राज्य सरकार देणार 12000 रुपये, प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला पैसे जमा होणार

Mukhyamantri Maiya Samman Yojana : महायुती सरकारने केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला महाराष्ट्रात महिलांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. या अंतर्गत राज्यातील महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा होणार आहेत. 

राजीव कासले | Updated: Aug 19, 2024, 04:33 PM IST
आता 'या' महिलांना राज्य सरकार देणार 12000 रुपये, प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला पैसे जमा होणार title=

Mukhyamantri Maiya Samman Yojana : महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला (Ladki Babin Yojana) महिलांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. ही योजना महायुतीसाठी (Mahayuti) विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरु शकते, असा विश्वास महायुती सरकारला आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांच्या खात्यात दरमहिना 1500 रुपये म्हणजे वर्षाला 18000 रुपये जमा होणार आहेत. याशिवाय केंद्र सरकारकडूनही महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवल्या जात आहे. केंद्राशिवाय वेगवेगळ्या राज्याकडूनही अशा योजना सध्या सुरु आहेत. यात आता आणखी एक योजनेची भर पडली आहे. 

मुख्यमत्री मैय्या सन्मान योजना
महाराष्ट्र सरकारनंतर आता झारखंड सरकारने महिलांसाठी नवी योजना सुरु केली आहे. या योजनेचं नाव 'मुख्यमत्री मैय्या सन्मान योजना' (Mukhyamantri Maiya Samman Yojana)असं ठेवण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत झारखंड राज्यातील महिलांना वार्षिक 12 हजार रुपये दिले जाणार आहेत. दर महिन्याच्या 15 तारखेला या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. 

'या' महिलांना मिळणार लाभ
झारखंड सरकारच्या मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्यााल हजार रुपये दिले जाणार आहेत. अंत्योदय श्रेणीत येणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 21 ते 50 वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र ठरु शकतात. महिला बाल विकास व सामाजिक सुरक्षा विभागाद्वारे या योजनेचं काम पाहिलंजातं. या योजने आतापर्यंत 37 महिलांनी अर्ज दाखल केला आहे. 

या कागदपत्रांची आवश्यकता
मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजनेसाठी अर्ज करताना काही अत्यावश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. यात पासपोर्ट साईज फोटो, बँक पासबूक, आधारकार्ड आणि रेशन कार्डची झेरॉक्स गरजेची असणार आहे. ज्या महिलांचं नाव रेशनकार्डमध्ये नाही, अशा महिला आपल्या पतीच्या रेशनकार्डचा वापर करु शकतात. 

15 तारखेला पैसे जमा
झारखंड सरकारच्या मुख्यमंत्री मैय्या सन्मान योजनेचा पहिला हफ्ता 21 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ही महत्त्कांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याच्या पंधरा तारखेला महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.