मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये डॉक्टरकडे वैद्यकीय तपासणीसाठी पोहोचलेल्या एका रुग्णाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. रुग्णालयात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये मृत्यूचा हा लाईव्ह व्हिडीओ कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला.
परदेशीपुरा पोलीस ठाण्याचे प्रभारी पंकज द्विवेदी यांनी सांगितलं की, "शनिवारी-रविवारी रात्री ही घटना घडली. एक तरुण छातीत दुखत असल्याने रुग्णालयात पोहोचला होता. पण उपचार मिळण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. नातेवाईक त्याला घेऊन खासगी रुग्णालयातही पोहोचले होते. पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं".
31 वर्षीय तरुणाचं नाव सोनू मतकर होतं. सोनू इंदौरचाच नागरिक होता आणि रिक्षा चालवून उदरनिर्वाह करायचा. रात्री अचानक सोनूच्या छातीत दुखू लागलं होतं. यानंतर तो स्वत: रिक्षा चालवत परदेशीपुरा क्षेत्रातील दयानंद रुग्णलयात पोहोचला होता. पण तिथे उपचार मिळण्याआधीच त्याचं निधन झालं.
#heartattack2024 https://t.co/aKLG9jd1ph https://t.co/2cp08aMkYW pic.twitter.com/Desl6oKNkz
— Dee (@DeeEternalOpt) August 18, 2024
व्हिडीओत दिसत आहे की, सोनू आपल्या मित्रासह रुग्णालयात येते. यावेळी डॉक्टर त्याला खुर्चीवर बसवून तपासणी करतात. यादरम्यान सोनूचा हात छातीवर असल्याचं दिसत आहे. काही वेळाने सोनू शुद्ध हरपून खाली पडतो. यावेळी डॉक्टर आणि इतरांना नेमकं काय होतं समजत नाही. काही वेळाने तो खुर्चीसह खाली पडतो.
A #shocking incident of death due to heart attack has come to light in #Indore #MadhyaPradesh
After feeling #chestpain & restlessness,
an auto driver had reached the clinic for treatment.
While the #doctor was examining, his heartbeat stopped. The incident captured in #CCTV pic.twitter.com/giS6raVbO9— Ravi Pratap Dubey (@ravipratapdubey) August 19, 2024
प्राथमिकदृष्ट्या तरुणाला ह्रद्यविकाराचा झटका आल्याचं दिसत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.