मुंबई : जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर ही बातमी खास, तुमच्यासाठी. कारण, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेनं विविध पदांसाठी नोकरीची संधी तुमच्या भेटीला आणली आहे. त्यासाठीची जाहिरातही रेल्वेनं प्रसिद्ध केली आहे.
सदर नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुनपर्यंत असल्याचं सांगण्यात येत आहे. नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेमध्ये यावेळी तब्बल 5636 रिक् पदांवर नोकरीची संधी आहे. नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणं मात्र गरजेचं आहे. (Job News north east frontier railway recruitment vacancies)
या नोकरीसाठी तुमचं शिक्षण 10 वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. शिवाय ITI ची पदवी असणंही गरजेचं असेल. 15 ते 24 वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज दाखल करु शकतात.
मेरिट लिस्टनुसार या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. कोणत्याही परीक्षेशिवाय ही नोकरी मिळू शकणार आहे.
नोकरीसाठी अर्ज कसा करावा?
नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी nfr.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर लॉगईन करावं लागणार आहे. यानंतर जनरल इन्फो या सेक्शनमध्ये जाऊन 'रेल्वे रिक्रुटमेंट सेल'वर क्लिक करा. यानंतर अप्लाय करण्यासाठीच्या लिंकवर क्लिक करुन आपली माहिती आणि आवश्यक कागदपत्र जोडा.
कुठे आहे नोकरीची संधी
कटिहार (केआईआर) आणि टीडीएच कार्यशाळा : 919
अलीपुरद्वार (एपीडीजे): 522
रंगिया (आरएनवाई): 551
लुमडिंग (एलएमजी), एस एंड टी / वर्कशॉप / एमएलजी (पीएनओ) आणि ट्रैक मशीन
/ एमएलजी: 1140
तिनसुकिया (TSK): 547
नवी बोंगाईगांव कार्यशाळा (एनबीक्यूएस) आणि ईडब्ल्यूएस / बीएनजीएन: 1110
डिब्रूगढ़ कार्यशाळा (डीबीडब्ल्यूएस): 847