चंदीगड : सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश रोहतक तुरुंगात जाऊन, बलात्कार प्रकरणातील आरोपी बाबा गुरमीत राम रहीमला शिक्षा शिक्षा सुनावणार आहेत. न्यायाधीशच आता तुरुंगात जाऊन शिक्षा सुनावणार आहेत. राम रहीमला सोमवारी कोर्टात नेण्यात येणार नाही.
राम रहीमच्या समर्थकांनी कायदा हातात घेत जाळपोळ केली आणि मालमत्तेचं अतोनात नुकसान केलं. या हिंसाचारात ३१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. राम रहीम साध्वीवरील बलात्कार प्रकरणात दोषी आढळल्यानंतर हरियाणात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला.
सीबीआय कोर्टाच्या न्यायाधीशांना हेलिकॉप्टरने थेट तुरुंगात आणलं जाणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षेच्या सुनावणीसाठी रोहतक तुरुंगातच सोमवारी कोर्ट रुम तयार करण्यात येणार आहे.