कांगारूला गिळत होता अजगर, त्यावेळी छोट्या कांगारूने.... Video जोरदार व्हायरल

माणसापेक्षा प्राणीच कसे प्रामाणिक असतात याचं उदाहरण दाखवणारा कांगारूचा व्हिडीओ

Updated: Sep 3, 2022, 06:47 PM IST
कांगारूला गिळत होता अजगर, त्यावेळी छोट्या कांगारूने.... Video जोरदार व्हायरल  title=

Kangaroo Boa Viral Video : संपूर्ण विश्वामध्ये दररोज चित्र-विचित्र घटना घडत असतात, ज्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. यातील काही घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जे पाहून अनेकदा विश्वास ठेवणं कठीण जातं किंवा यातील बहुतेक व्हिडिओ खरे आहेत. अशातच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये प्राण्यांमधील प्रेम या पाहायला मिळत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये महाकाय अजगराने कांगारूला वेढा मारला आहे. त्यामुळे कांगारूची अजगर शिकार करतो असं वाटत असतं. मात्र त्याचवेळी देवदुतासारखा एक कांगारू येतो आणि अजगराला बाजू करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र दुर्देवाने त्याला वाचवण्यात अपयशी ठरतो.

लहान कांगारू सतत आपल्या मित्राचं रक्षण करण्याचा प्रयत्न करत होता. त्याला वाचवण्यासाठी कधी तो अजगराच्या तोंडाला तर कधी त्याच्या शरीराला चावण्याचा प्रयत्न करताना दिसत होता. महाकाय अजगराच्या तावडीतून वाचवण्यासाठी छोटा कांगारू सर्वतोपरी प्रयत्न करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, हा व्हिडीओ वाइल्डलाइफ अॅनिमल्सने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. याला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत.