Video : "लाजवाब नमकीन..."; काचा बादामनंतर 'भोपाली नमकीन वाले' काकांचे रिमिक्स ऐकाच

नमकीन चाचा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत

Updated: Sep 3, 2022, 06:23 PM IST
Video : "लाजवाब नमकीन..."; काचा बादामनंतर 'भोपाली नमकीन वाले' काकांचे रिमिक्स ऐकाच title=

'काचा बादाम' (Kacha Badam) हे गाणे सर्वांनी ऐकलेच असेल. या गाण्याचे गायक भुबन बादायकरही (Bhuban Badyakar)अगदी अल्पावधीतच प्रसिद्ध झाले होते. त्यांचा गाणं म्हणतानाचा व्हिडिओही खूप व्हायरल झाला. त्यानंतर त्यांच्या गाण्यावर रिल्सही येऊ लागल्या. मध्य प्रदेशची (madhya pradesh) राजधानी राजधानी भोपाळमध्ये (bhopal) फरसाण विकणाऱ्या व्यक्तीचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे आणि या व्यक्तीचे खूप कौतुक केले जात आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती फरसाण विकत आहेत. त्यांची विक्री करण्याची शैली खूप वेगळी आहे. ही व्यक्ती भोपाळची आहे आणि चमचमीत फरसाण विकण्याच्या पद्धतीनं सगळ्यांना आकर्षित करत आहे. 

भोपाळमध्ये अनेकदा रस्त्यावर विक्रेते  वस्तू लावून विकताना दिसतात. पण या भोपाळी व्यक्तीचा गुण म्हणजे त्याची भोपाळी टोनमध्ये बोलण्याची शैली. हा व्यक्ती अनोख्या आणि विचित्र पद्धतीने फरसाण विकत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

या व्यक्तीचे बोलणे ऐकून तुम्हाला क्षणभर असे वाटेल की तो गाणे म्हणणार आहे. परंतु काही वेळाने ती व्यक्ती गाताना त्याच्याकडे असलेल्या विविध फरसाणची माहिती देतो.

ही व्यक्ती भोपाळच्या गल्ली-बोळात आपल्या स्कूटरवर फरसाण विकताना दिसत आहे. पण, फरसाण विकण्याची त्यांची शैली फार वेगळी आहे. यामुळे जेथून ते जातात लोक त्यांच्याकडून फरसाण विकत घेण्यासाठी दररोज थांबतात.

त्यांच्या या वेगळ्या शैलीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांना 'भोपाली नमकीन वाले चाचा' अशी ओखळ सोशल मीडियावर मिळाली आहे.