'बाबा का ढाबा' चालवणाऱ्या कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न

बाबा का ढाबा चालवणाऱ्या कांता प्रसाद यांना उपचारासाठी आता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Updated: Jun 18, 2021, 03:04 PM IST
'बाबा का ढाबा' चालवणाऱ्या कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई: कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळालेल्या बाबा का ढाबा यांचा ढाबा नुकताच बंद झाला. त्यानंतर आता धक्कादायक बातमी समोर येत आहे. बाबा का ढाबा चालवणाऱ्या कांता प्रसाद यांनी धक्कादायक पाऊल उचललं आहे. 

कांता प्रसाद यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कांता प्रसाद यांनी मद्यप्राशन करून झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कांता प्रसाद यांना उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 10 च्या सुमारास कांता प्रसाद नशेमध्ये होते. त्यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. कांता प्रसाद यांना रात्री उशिरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

संबंधित बातमी बाबा का ढाबा - पिक्चर अभी बाकी है...

दिल्लीच्या मालवीर नगरमध्ये ढाबा चालवणारे कांता प्रसाद एका व्हिडीओनंतर वेगानं प्रसिद्ध झाले. लॉकडाऊनमध्ये रातोरात त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर युट्यूबर गौरव आणि कांता प्रसाद यांच्यात झालेल्या वादामुळे ते कायम चर्चेत राहिले. आता त्यांचा ढाबा बंद झाल्याची माहिती मिळाली आहे.