कर्नाटकात गोकक मतदारसंघातून भाजपचे रमेश जारकिहोली विजयी

येडियुरप्पा सरकारचं भविष्य ठरणार 

Updated: Dec 9, 2019, 03:44 PM IST
कर्नाटकात गोकक मतदारसंघातून भाजपचे रमेश जारकिहोली विजयी

मुंबई : कर्नाटक विधानसभेच्या 15 मतदारसंघामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीचा सोमवारी निकाल जाहीर होणार आहे. आजच्या पोटनिवडणुकीच्या निकालावर येडियुरप्पा सरकारचं भाग्य ठरवणार आहे. काँग्रेस पक्षाची नजर देखील आजच्या निकालावर असणार आहे. 

पाहा कर्नाटक पोटनिवडणुकीच्या निकालाचे LIVE UPDATES 

* गोकक मतदारसंघातून भाजपचे रमेश जाराकिहोली विजयी. 

* कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी विजय साजरा केला. मुलगा विजयेंद्र यांचा विजय 

* काँग्रेस नेता डी के शिवकुमार यांनी अपयश स्वीकारली आहे. जनतेचा जनादेश आम्ही स्वीकारला आहे. आम्ही आमचं अपयश स्वीकारतो. 

*भाजप 12 ठिकाणी आघाडीवर तर काँग्रेस 2 ठिकाणी आघाडीवर आणि जेडीएस 0 जागेवर,  अपक्ष 1 ठिकाणी आघाडीवर

* मतमोजणीला सुरूवात होऊन दोन तास झाले आहेत. भाजप 10 जागांवर आघाडीवर असून काँग्रेस आणि जेडीएस मात्र अजून दोनच जागांवर आघाडीवर आहेत. 

कर्नाटक पोटनिवडणुकीच्या निकालात भाजप नऊ जागांवर आघाडीवर, काँग्रेस आणि जेडीएस 2 जागांवर आघाडीवर, 1 अपक्ष आघाडीवर 

* भाजप येल्लापूर, चिकबेलापुर मतदारसंघात आघाडीवर तर काँग्रेस शिवाजीनगर आणि हुनसूर या मतदारसंघात आघाडीवर आणि जेडीएस केआर पेटे मतदारसंघात आघाडीवर 

शिवाजीनगर मतदारसंघात काँग्रेसचे रिझवान अर्शद आघाडीवर  

 

* भाजप 15 जागांपैकी सहा जागांवरा आघाडीवर, काँग्रेसने अद्याप खातं उघडलेलं नाही 

*जेडीएस एका जागेवर आघाडीवर 

* दोन जागांवर भाजप आघाडीवर 

अठानी, कगवाड, गोकक, येलापुर, हिरेकेरूर, रानीबेन्नूर, विजयनगर, चिकबेलापुर, के.आर. पुरा, यशवंतपुरा, महालक्ष्मी लेआउट, शिवाजीनगर, होसाकोटे, के.आर. पेटे, हुनसूर या मतदारसंघात पोडनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात 

* मतमोजणीला सुरूवात, थोड्याच वेळात निकाल हाती येणार

5 डिसेंबर रोजी झालेल्या पोटनिवडणुकीकरता 67.91 टक्के मतदान झाले होते. सोमवारी सकाळी आठ वाजता मत मोजणीला सुरूवात होणार असून दुपारपर्यंत कर्नाटक पोटनिवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट होईल. विधानसभेच्या 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होणार असून त्यातल्या किमान 7 जागांवर विजय मिळवणं बहुमतासाठी येडियुरप्पा यांना आवश्यक आहे.

येडियुरप्पा यांची सत्ता येण्या अगोदर काँग्रेस-जेडीएस यांची सरकार होती. जी फक्त 14 महिने टिकली. कारण काँग्रेसचे 14 आणि जेडीएसची तीन आमदारांनी राजीनामा दिला. आता 15 मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असून दोन जागांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. येडियुरप्पा सरकारने 29 जुलै रोजी विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. 

भाजपकडे 105 आमदार आहेत. सत्ता टिकवण्यासाठी त्यांना आणखी 6 आमदारांची गरज आहे. 15 पैकी 12 जागांवर काँग्रेस आणि 3 जागांवर जेडीएसने लढवल्या आहेत. निवडणुकीनंतर झालेल्या एक्झिट पोल्समध्ये भाजप सर्वाधिक जागा जिंकेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

२२४ सदस्य संख्या असलेल्या विधानसभेतील संख्याबळ २०८ पर्यंत कमी झाल्यानंतर येडियुरप्पा यांनी १०५ आमदारांसह विश्वासदर्शक ठराव जिंकला होता.