बलात्काराच्या घटनांनी सोनिया गांधी दु:खी; वाढदिवस साजरा करणार नाही

बलात्कारांच्या घटनांमुळे देशात संतापाची लाट आहे.

Updated: Dec 8, 2019, 04:32 PM IST
बलात्काराच्या घटनांनी सोनिया गांधी दु:खी; वाढदिवस साजरा करणार नाही
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : देशातील विविध भागात बलात्काराच्या घटना वाढताना दिसत आहेत. या सर्व घटनांनी दु:खी होत, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सोमवारी आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचं सांगितलं. सोमवारी सोनिया गांधी ७३ वर्षांच्या होतील.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात वेग-वेगळ्या ठिकाणी सुरु असलेल्या बलात्काराच्या घटनांमुळे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी दु:खी आहेत आणि त्यामुळेच त्या सोमवारी आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याची माहिती मिळत आहे. सोनिया गांधींचा हा निर्णय उन्नाव बलात्कार पीडितेची जाळून हत्या करुन दिल्लीच्या रुग्णालयात तिचं निधन झाल्यानंतर आला आहे. त्याआधी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करुन तिची जाळून हत्या करण्यात आली होती.

देशात अनेक ठिकाणी महिलांवरील गुन्ह्यांच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या घटनांमुळे देशात संतापाची लाट आहे. सोनिया गांधी यांनी बलात्काराच्या घटनांवर दु:ख व्यक्त करत कायदा-व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये बलात्कार पीडितेला जिवंत जाळल्याप्रकरणी काँग्रेसने उन्नाव, लखनऊमध्ये जोरदार निदर्शनं केली होती.