तिरुवअनंतपुरम: निसर्गाच्या अवकृपेनं पाण्याखाली गेलेल्या केरळच्या जनतेला गेल्या ३६ तासात मोठा दिलासा मिळालाय. पावसाचा जोर आता ओसरलाय. पुढच्या चार दिवसात पाऊस हळहळू कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. त्यामुळे पुराच्या तडख्यात सापडलेल्या केरळच्या नागरिकांनी आता सुटकेचा निश्वास सोडलाय.
दरम्यान गेल्या ४८ तासात मदत कार्यासाठी उतरलेल्या एनडीआरएफ, लष्कर, नौदल आणि वायूसेनेच्या हजारो सैनिकांच्या प्रयत्नांनाही मोठं यश मिळातंय. जवळपास चार लाख लोकांना मदत छावण्यामध्ये हलवण्यात आलं. तर शेकडो टन अत्यावश्यक वस्तू आता पुरात अडकलेल्या जनतेला वाटण्यात आल्या आहेत. आणखी काही दिवस मदत आणि बचाव कार्य असंच युद्ध पातळीवर सुरु राहणार आहे.
दरम्यान, गेला आठवडाभर कोचीचं विमानतळ आज सुरू होतंय. सकाळी कोचीच्या नौदलाच्या धावपट्टीवर पहिलं व्यावसायिक विमान उतरलं. दुपारनंतर राज्यातले सर्व रेल्वे मार्गही हळूहळू सुरू करण्यात येतील असं रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटलंय.