घसरगुंडीचा खेळ असा फसला आणि हा छोटा धपकन पडला... पाहा यांच्या स्टंटबाजीचा व्हिडीओ

आजकाल प्रत्येकाला काहीतरी वेगळे आणि तुफानी करायचे असते. ज्यामुळे लोकं ते करतात आणि त्याला सोशल मीडियावर अपलोड करतात.

Updated: Sep 28, 2021, 06:07 PM IST
घसरगुंडीचा खेळ असा फसला आणि हा छोटा धपकन पडला... पाहा यांच्या स्टंटबाजीचा व्हिडीओ

मुंबई : आजकाल प्रत्येकाला काहीतरी वेगळे आणि तुफानी करायचे असते. ज्यामुळे लोकं ते करतात आणि त्याला सोशल मीडियावर अपलोड करतात, ज्यामुळे त्यांना सोशल मीडियावर प्रसिद्धी देखील मिळते. मात्र, काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात अनेक वेळा अशी घटना घडतात, ज्या खूप डेन्जरस आणि जिवघेणे ठरु शकतात. जे पाहून आपल्याला धक्का बसतो. तर काही असे व्हिडीओ असताता जे पाहून आपल्याला हसू देखील फुटतं.

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्ही बऱ्याचदा लहान मुलांना मैदाना खेळताना पाहिले असेल, मुलं म्हटली की, ते खेळताना पडतात, लोळताता मजा करतात. तुम्ही त्यांना कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी ते थांबत नाहीत, ज्यामुळे त्यांचे कपडे तर खराब होतातच, त्याचबरोबर काही वेळा त्यांना दुखापत देखील होते.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा लहान मुलांचा व्हिडीओ देखील असाच काहीसा आहे, यामध्ये तुम्ही पाहू शकता की, काही मुले एका निसरड्या भागाजवळ घसरगुंडी खेळण्याचा प्रयत्न करतात. परंतु या लहान मुलांना ही मजा भारी पडते. कारण यातील एक लहान मुलगा जेव्हा घसरगुंडी करत खाली येतो तेव्हा तो खालील दगडावरती जोरात आपटतो.

घसरगुंडी करण्याच्या नादात या चिमुकला एवढ्या जोरात आपटला की विचारायची सोय राहिली नाही. त्याच्या आनंदाचा विचका झाला आणि तो अखेर आपला पृष्ठभाग आपटल्याने हाताने तो भाग चोळत चालू लागला. त्याची झालेली फजिती पाहून आजूबाजूची मुलं आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटकरीही खो खो हसू लागले.

हा मुलगा इतक्या निरागसपणे हे करतो की, तुम्हाला ते पाहून हसू येईल. परंतु ही घटना झाल्यानंतर या मुलांना कळते की, येथे खेळण्याचा त्यांचा निर्णय चूकीचा आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा मजेदार व्हिडीओ लोकांना सोशल मीडियावर खूप आवडत आहे. अनेक यूजर्सनी यावर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने सांगितले की, 'आम्ही लहानपणी देखील अशी मजा करायचो. 'तर दुसऱ्या यूजरने सांगितले, 'मुलांची मजा पाहून मी माझे हसू थांबवू शकत नाही.' दुसऱ्या यूजरने लिहिले, 'पुढे कधीकधी स्टंट करण्यापूर्वी ही मुले शंभर वेळा विचार करतील.