तरुणांनी पकडला भलामोठा किंग कोबरा पण; विकृत वागण्यामुळे सोशल मीडियावर व्यक्त होतोय संताप

विकृतीचा कळस! किंग कोबरासोबत या तरुणांनी काय केलं पाहा व्हिडीओ

Updated: Jun 23, 2021, 03:08 PM IST
तरुणांनी पकडला भलामोठा किंग कोबरा पण; विकृत वागण्यामुळे सोशल मीडियावर व्यक्त होतोय संताप

मुंबई: बऱ्याचदा तरुण प्राणी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांसोबत गैरव्यवहार करत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सापाच्या शेपटीवर पाय देणं हा ऐकलं असेल पण प्रत्यक्षात तरुणांनी सापाच्या अंगावर पाय देऊन त्याच्याशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

किंग कोबराला पकडण्यासाठी आलेल्या तरुणांनी त्याच्यासोबत गैरवर्तन केले. हा विकृतीचा कळस पाहून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता तरुण झाडीमधून भल्यामोठ्या किंग कोबराला पकडून रस्त्यावर आणत आहेत.

हे तरुण त्या सापाला रस्त्यावर आणल्यानंतर त्याला अंगावर पाय देऊन उभे आहेत. किंग कोबरा या तरुणांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत आहे. हे तरुण नंतर त्याला एक पोत्यात भरताना त्याच्या अंगावर पाय देतात. हा संपूर्ण प्रकार पाहून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.

किंग कोबरासोबत केलेल्या या गैरव्यवहारामुळे सोशल मीडियावर अनेकांनी निराशा व्यक्त केली. परवीन डबास नावाच्या एका व्यक्तीनं या तरुणांना योग्य शिक्षणाची गरज असल्याचं कॅप्शन देऊन हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हि़डीओ 20 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 500 हून अधिक लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे याची माहिती मिळू शकली नाही.