राशीभविष्य २८ मार्च | 'या' राशीच्या व्यक्तींचे वैवाहिक जीवन असेल चांगले

असा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: Mar 28, 2020, 06:32 AM IST
राशीभविष्य २८ मार्च | 'या' राशीच्या व्यक्तींचे वैवाहिक जीवन असेल चांगले

मेष- आत्मविश्वासामुळे तुम्हाला कामामध्ये यश मिळेल. कामाच्या बाबतीत गांभीर्याने विचार करा. इतरांचे सल्ले ऐका. नवीन व्यक्तींना भेटण्याचा योग आहे. शिक्षण, व्यापार, नोकरीच्या निमित्ताने प्रवासयोग आहे. या प्रवासादरम्यान काही नव्या गोष्टी तुम्हाला कळतील. लग्नाविषची चर्चा होतील. तुमचा सन्मान वाढले. 

वृषभ - अचानक फायदा होण्याची चिन्हं. साथीदाराची मदत होईल. धनलाभ होण्याची शक्यता. अशा व्यक्तींची भेट घडेल जे तुमचा दृष्टीकोन बदलण्यासाठी प्रेरणादायी ठरतील. आज भावना आणि तणावाच्या गोष्टींविषयी इतरांशी चर्चा कराल. दैनंदिन कामं पूर्ण होतील. 

मिथुन- ऑफिसमध्ये खूप काम असेल. काही लोक तुमच्याकडून काम काढून घेण्याचा प्रयत्न करतील. नव्या व्यक्तींशी ओळख होईल. आज दिवसभर उत्साही असाल. नात्यांचे काही खास पैलू उलगडतील. अचानक समोर येणाऱ्या कामांसाठी स्वत:ला तयार ठेवा. रेंगाळलेली कामं पूर्ण होतील. 

कर्क- सोबतच्या सर्वांचाच व्यवहार तुमच्याप्रती चांगला असेल. व्यवहारकुशलतेमुळे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. आज दिवसभर सकारात्मक दृष्टीकोन असेल. विचारात असणारी सर्व कामं पूर्ण होतील. प्रयत्न करा, अनेकांचं समर्थन मिळेल. कार्यालयाच्या ठिकाणी संभाळून बोला.

सिंह- अनेक महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. आज नव्या व्यक्तींशी भेट घडण्याचा योग आहे. व्यक्तिमत्वं आणि कार्यक्षमता आणखी विकसित होईल. आरोग्याची काळजी घ्या. अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. गरज पडल्यास उदारी देखील घ्यावी लागेल. 

कन्या- सोबत असणाऱ्यांच्या अडचणी दूर होतील. आज असे काही निर्णय घ्याल ज्यांचा परिणाम फार दूरपर्यंत पाहायला मिळेल. वैवाहिक जीवन चांगलं असेल. आई- वडिलांसोबतचं नातं सुधारेल. अनेक गोष्टींचा सखोल विचार कराल. 

तुळ-  चांगल्या वाणीमुळे अनेक कामं साध्य होतील. कामाच्या निमित्ताने असणाऱ्या मुलाखतींमध्ये यशस्वी व्हाल. दिवस मात्र सर्वसामान्य असेल. स्वत:वर विश्वास ठेवा. नि:स्वार्थ राहून कामं पूर्णत्वास न्या. 

वृश्चिक- स्वत:मध्ये बदल करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनात काही कल्पना असतील तर आजचा दिवस खास आहे. अर्थार्जनाच्या नव्या संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी नम्रतेने वागा. व्यवसाय चांगला चालेल. काहीतरी नवीन करण्याची कल्पना सुचेल.

धनु-  नोकरीत पदोन्नती होण्याती शक्यता आहे. स्वत:सोबत इतरांवरही विश्वास ठेवा. अनेकांचं प्रेम तुम्हाला मिळणार असून, तुमच्या व्यक्तीमत्वाची इतरांवरही छाप पाडाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. 

मकर- शारीरिक स्थिती चांगली असेल. कोणत्याही कामातून काढता पाय घेऊ नका. आत्मविश्वासाच्या बळावर नवी ओळख प्रस्थापित कराल. ज्याचा तुम्हालाच फायदा होणार आहे. आर्थिक स्थितीमध्ये सुधार होईल.

कुंभ- देवाणघेवाणीच्या बाबतीत आज गांभार्याने विचार करा. दिवस चांगला आहे. भविष्यातील योजनांवर विश्वास ठेवा. साथीदारासोबत असणारे मतभेद दूर होतील. आई- वडिलांची मदत होईल. व्यवसायात अवलंबून राहावे लागेल.

मीन- नशिबाची साथ मिळेल. आजची परिस्थिती तुम्हाला बऱ्याच गोष्टींसाठी प्रेरित करेल. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळेल. सासरच्यांकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता. तुमच्या बोलण्यावर संयम ठेवा. पगाराप्रमाणे खर्च करा.