बिटकॉईन: अमिताभ बच्चन यांना कोट्यवधीचा फटका

बिटकॉईन चांगली कमाई करत असताना बच्चन पीता-पुत्रांनी रग्गड कमाई केली. मात्र....

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 25, 2017, 10:51 AM IST
बिटकॉईन: अमिताभ बच्चन यांना कोट्यवधीचा फटका title=

मुंबई : घसरलेला आणि घसरत असलेला बिटकॉईन जगभरातील अनेकांची डोकेदुखी ठरला आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनाही बिटकॉईन घसरणीचा चांगलाच फटका बसला. अर्थात बिटकॉईन चांगली कमाई करत असताना बच्चन पीता-पुत्रांनी रग्गड कमाई केली. मात्र, बिटकॉईन घसरल्याने त्यांना मोटा तोटा सहन करावा लागत आहे.

काही वर्षांपूर्वीच केली होती बिटकॉईनमध्ये गुंतवणूक

बिटकॉईन जेव्हा तेजीत होता तेव्हा अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या पिता-पुत्रांनी  तब्बल 100 मिलियन डॉलर ( भारतीय रूपयात 640.3कोटी रूपये) इतकी कमाई केली होती. मात्र, बिटकॉईनसारख्या बेभरवशाच्या चलनात त्यांनी जितक्या वेगाने पैसे कमावले तितक्याच वेगाने त्यांना त्यात तोटाही सहन करावा लागत आहे. प्राप्त माहितीनुसार, बच्चन यांनी बिटकॉईनमध्ये साधार 3 ते 4 वर्षांपूर्वी गुंतवणूक केली होती. त्यामुळे बिटकॉईन तेजीत येताच त्यांना त्याचा जोरदार फायदा झाला. पण, सध्या बिटकॉईनचा बुडबुडा फुटण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा जगभरात सुरू आहे.

बच्चन यांचे 2.38 टक्के शेअर्स 

अमिताभ बच्चन यांनी हैदराबाद येथील स्टॅम्पमेड कॅपीटलचे शेअर्स खरेदी केले होते. ही ट्रेडींग कंपनी स्वत: रिसर्चवर आधारीत जागतीक ट्रेड हाऊस असल्याचे सांगते. तसेच, आपण प्रती सेंकंद कागी कोटींचा व्यवसाय करतो असाही या कंपनीचा दावा असतो. आपल्या अधिकृत कागदपत्रांमध्ये कंपनीने बच्चन यांना 'इंडिव्हिज्यूअल नॉन-प्रमोटर शेअरहोल्डर' असल्याचे म्हटले आहे. गेल्या तिमाहीत अमिताभ बच्चन यांनी या कंपनीत आपले 2.38 टक्के शेअर्स असल्याचे म्हटले होते. मात्र, बीएसईच्या रेकॉर्डनुसार अमिताभ शेअरहोल्डरच्या यादीत जून 2014पासून आहेत. पण, त्यांची गुंतवणूकीची रक्कम सातत्याने बदलत असल्याचे दिसते.

पैसे वेगाने आले वेगाने गेले

जून 2014मध्ये बच्चन यांनी कंपनीत 3.39 टक्के शेअर्स होते. ज्याची किंमत सुमारे 9 कोटींच्या घरात होती. मात्र, सध्या त्याची किंमत 4.7 कोटी इतकी आहे. ही ट्रेडींग कंपनी लॉन्गफिन कॉर्पची सब्सिडियरी आहे. स्टॅम्मेडची लॉन्गफिनमध्ये 37.14 टक्के भागिदारी आहे. लॉन्गफिनच्या दुसऱ्या एका कंपनीने अधिग्रहण केले आहे. जी बिटकॉऩ तयार करते. या कंपनीसोबत बच्चन अप्रत्यक्षरित्या जोडले गेले आहेत. बिटकॉईनच्या लाटेत बच्चन यांनी वेगाने 640 कोटी तर, कमावले. पण, तितक्याच कमी वेळात आणि त्याच वेगात पैसे गमावलेही.