'लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स'साठी असा करा ONLINE अर्ज

ही पद्धत अगदी सोपी आहे आणि त्यामुळे तुमच्या आरटीओ ऑफिसला फेऱ्याही टळतील

Updated: Jan 9, 2019, 03:27 PM IST
'लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स'साठी असा करा ONLINE अर्ज  title=

मुंबई : तुमचा वाहन परवाना अर्थात ड्रायव्हिंग लायसन्सही आधारला जोडावं लागेल, असं कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं होतं. परंतु, तुम्ही अदयाप गाडी चालवायची शिकण्याच्या स्टेजमध्ये असाल तर लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स बनवलं नसेल तर तुम्ही यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकता. यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचू शकेल. ही पद्धत अगदी सोपी आहे आणि त्यामुळे तुमच्या आरटीओ ऑफिसला फेऱ्याही टळतील. लर्निंग लायसन्ससाठी तुम्हाला केवळ २०० रुपये फी भरावी लागेल. लर्निंग लायसन्ससाठी कमीत कमी १८ वर्षांची वयोमर्यादा आहे. 

कसा कराल ऑनलाईन अर्ज

१. यासाठी तुम्हाला मंत्रालयाची वेबसाईट https://parivahan.gov.in/sarathiservice10/stateSelection.do  वर जावं लागेल. इथं तुम्हाला तुमचं राज्य निवडावं लागेल. इथे शिकावू (Learner) हे ऑप्शन तुम्हाला निवडावं लागेल. इथे क्लिक केल्यावर एक फॉर्म उघडतो. हा फॉर्म भरल्यानंतर एक क्रमांक जनरेट होईल... हा क्रमांक तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. इथे तुम्हाला वय प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा तसंच ओळखपत्र जोडावं लागेल. 

२. या प्रक्रियेनंतर तुम्हाला आपला फोटो आणि डिजिटल सही अपलोड करावी लागेल. त्यानंतर टेस्टसाठी एक वेळ बुक करावी लागेल. वेळेची निवड करताना तुम्हाला २०० रुपये फी भरावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ज मोबाईल क्रमांकावर एक मॅसेज येईल. 

३. फी भरल्यानंतर निर्धारित वेळेनुसार आरटीओ ऑफीसमध्ये जाऊन तुम्हाला टेस्ट द्यावी लागेल. यात यशस्वी ठरल्यानंतर पुढच्या ४८ तासांत ऑनलाईन लर्निंग लायसन्स तुम्हाला ऑनलाईनच प्राप्त होईल. हे लर्निंग लायसन्स पुढच्या सहा महिन्यांपर्यंत वैध असेल. 

४. या सहा महिन्यांदरम्यान तुम्हाला पर्मनंट लायसन्ससाठी अर्ज करावा लागेल. लर्निंग लायसन्स मिळाल्यानंतर एका महिन्यानंतर आणि सहा महिन्यांच्या आत तुम्हाला दुसऱ्यांदा ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. दुसऱ्यांदा टेस्टमध्ये यशस्वी ठरल्यानंतर पर्मनंट लायसन्स तुम्हाला मिळू शकेल.