टूथपेस्टवर असलेल्या या छोट्या चौकोनाचा अर्थ काय? हे चिन्ह का असते?

 ते का असते? याचा उपयोग काय? तर आज आम्ही तुम्हाला याची माहिती देणार आहोत.

Updated: Jul 5, 2021, 08:53 PM IST
टूथपेस्टवर असलेल्या या छोट्या चौकोनाचा अर्थ काय? हे चिन्ह का असते? title=

मुंबई : सकाळी उठल्यावर आपण सगळ्या पाहिलं आपलं दात घासतो आणि तोंड स्वच्छ ठेवतो. परंतु यासाठी तुमची टूथपेस्ट चांगली असणे सर्वात महत्वाचे आहे. म्हणूनच आपण ती विकत घेण्यापूर्वी बर्‍याच गोष्टींचा विचार करतो. ही चांगली टूथपेस्ट आहे का? ती जास्त काळ टिकेल का? ती आपलं तोंड स्वच्छ आणि फ्रेश ठेवेलं का? त्याचप्रमाणे आपल्या दातांचे जंतूंपासून संरक्षण करेल का? यासाठी तुम्ही वेगवेगळे टूथपेस्टचे विकत घेतले असतील. परंतु तुम्हाला हे माहित आहे की, पेस्टच्या ट्यूबच्या खालच्या बाजूला एक चिन्ह बनलेले असते. ते का असते? याचा उपयोग काय? तर आज आम्ही तुम्हाला याची माहिती देणार आहोत.

कोणते चिन्ह दिसते

तुमच्या टूथपेस्ट वर एकदा नजर टाका. त्याच्या खालच्या बाजूला तुम्हाला एक छोटा चौकोन दिसेल. ते लाल, हिरव्या किंवा निळ्या रंगाचे असते. इंटरनेटवर या चिन्हांबद्दल आणि त्याच्या रंगांबद्दल बर्‍याच गोष्टी सांगितल्या जातात. परंतु आम्ही त्याचे सत्य तुम्हाला सांगणार आहोत.

इंटरनेटवर काय सांगितले जाते

जेव्हा आपण या चिन्हांबद्दल किंवा या चौकोनाबद्दल Google ला विचारतो तेव्हा बर्‍याच गोष्टी समोर येतात. अनेक अहवालांनी असा दावा केला आहे की, पेस्टची गुणवत्ता या चौरस आणि याच्या वेगवेगळ्या रंगांमुळे समजते किंवा काही वेळा असे ही सांगितले जाते की, या चिन्हांच्या रंगांसारखे घटक पेस्टमध्ये मिसळले गेले आहेत. परंतु हे सगळे खोटे आहे.

रंगांच्या आधारावर

काळे चिन्ह- रसायनांनी बनवलेली पेस्ट
लाल चिन्ह - नैसर्गिक पद्धती आणि रसायनांनी बनवलेली पेस्ट
निळा चिन्ह - तेथे नैसर्गिक आणि औषधांनी बनवलेली पेस्ट 
हिरवे चिन्ह - पूर्णपणे नैसर्गिक टूथपेस्ट

चिन्हांचे सत्य काय?

खरेतर कोलगेटच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, टूथपेस्टवर बनवलेले हे चिन्ह गुणवत्तेची हमी देत नाही, तर हे चिन्ह यासाठी बनवले जाते ज्याच्या माध्यमातून टूथपेस्टची नळी बनवणाऱ्या लोकांना याला कुठून कापावे आणि कुठून सील करावे यासाठी केले असते. म्हणूनच हे चिन्ह त्या ट्यूबवर असते.

या चिन्हांचे कार्य काय?

खरेतर ट्यूब बनवण्याऱ्या मशीन्सना या चिन्हाद्वारे काम करणे सहज शक्य होते. मशीनच्या लाइट सेन्सरला या चिन्हाचा जाणीव होतो आणि त्यानुसार मशीन ट्यूब कट करते आणि सील करते.