छोट्याश्या गावातील मजुराचे नशीब फळफळले; खोदकाम करताना सापडली मौल्यवान वास्तु, किंमत तब्बल...

Diamond Found In The Mine: मध्य प्रदेशातून एक बातमी समोर आली आहे. मजुराला खोदकाम करताना एक मौल्यवान वस्तु सापडली आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 21, 2024, 11:08 AM IST
छोट्याश्या गावातील मजुराचे नशीब फळफळले; खोदकाम करताना सापडली मौल्यवान वास्तु, किंमत तब्बल...  title=
labourer Panna 5 carat diamond found during excavation know its price

Diamond Found In The Mine: मध्य प्रदेशच्या पन्ना येथील एका मजुराचे नशीब फळफळले आहे. या मजुराला खोदकाम करताना एक मौल्यवान वस्तु सापडली आहे. हिराच्या खाणीत खोदकाम करताना त्याला एक मौल्यवान हिरा सापडला आहे. हिरा सापडताच त्या व्यक्तीचा आनंद चेहऱ्यावरुन झळकत होता.  या हिऱ्याची किंमत 20 लाख रुपयांपर्यंत असू शकते तसंच, 8.87 कॅरेटचा हिरा असू शकतो. या हिऱ्याला पन्नाच्या हिरा कार्यालयात जमा करण्यात आलं आहे. 4 डिसेंबर रोजी होणाऱ्या लिलावात हा हिरा ठेवण्यात येणार आहे. 

पन्नाच्या जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 12 किमी लांब असलेल्या बिलखुरा येथे राहणाऱ्या मजुर सुरेंद्र सिंह गौड याला कृष्णा कल्याणपुर पटीच्या हिरा खाणीत खोदकाम करताना 5.87 कॅरेटचा मौल्यवान हिरा सापडला आहे. या हिऱ्याची किंमत जवळपास 20 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. मजुराला बुधवारी तो हिरा या कार्यालयात जमा करण्यात आला आहे. या हिऱ्यासाठी 4 डिसेंबर रोजी होणाऱ्या लिलावात ठेवलं जाणार आहे. त्यातून जे किंमत येईल त्यातील 11.50 टक्के रॉयल्टी (स्वामित्व हक्क) कापून उर्वरित पैसे सुरेंद्र सिंह यांना पैसे दिले जाणार आहे. 

हिरे पारखी अनुपम सिंह यांनी म्हटलं की, सुरेंद्रने कृष्णा कल्याणपुर पटी येथे हिरा खाण सुरु केली आहे. खाणीत खोदकाम करताना सुरेंद्र यांना 5.87 कॅरेटचा हिरा सापडला होता. येत्या 4 डिसेंबर रोजी एकुण 81 नग हिरे ठेवले जाणार आहेत. ज्याचे वजन 241.71 कॅरेट इतके आहे. याची किंमत तीन कोटी 80 लाख इतकी असू शकेत, असा अंदाज वर्तवण्यात येणार आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील पन्ना गाव हे हिऱ्यांचे गाव म्हणून ओळखलं जातं. या गावातील ग्रामस्थांना आत्तापर्यंत अनेकदा हिरे सापडले आहेत. हिऱ्याच्या खाणी असल्याने इथे हिरे सापडत असल्याचे म्हटलं जाते.