Lalu Prasad Yadav वडिलांच्या प्रकृतीसाठी मुलगी देणार किडनी; पोस्ट पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

प्रत्येक लेकीसाठी गर्वाचा क्षण... लालू प्रसाद यादव यांना मुलगी वडिलांना देणार किडनी; पण म्हणते 'फक्त एक छोटासा मांसाचा तुकडाच तर देणार आहे.. '  

Updated: Dec 5, 2022, 12:56 PM IST
Lalu Prasad Yadav वडिलांच्या प्रकृतीसाठी मुलगी देणार किडनी; पोस्ट पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी title=

Lalu Prasad Yadav Health update : राष्ट्रीय जनता दल (RJD) चे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची प्रकृतीबद्दल रोज नवे अपडेट समोर येत असतात. आता लालू प्रसाद यादव यांची प्रकृती सुधारावी म्हणून मुलगी रोहिणी आचार्यने (Rohini Acharya) मोठा निर्णय घेतला आहे. आज रोहिणी वडिलांना किडनी देणार (kidney transplant)  आहे. वडिलांसाठी लेकीने केलेलं त्याग आज प्रत्येक मुलीसाठी गर्वाचा क्षण असणार आहे. 

रोहिणी आचार्य देणार वडिलांना किडनी

लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य आज वडिलांना किडनी देणार आहे. यावर रोहिणी यांनी केलेलं वक्तव्य पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल. रोहिणी म्हणाल्या, 'मला फक्त एक छोटासा मांसाचा गोळा वडिलांना द्यायचा आहे. वडिलांसाठी मी काहीही करु शकते.' (lalu yadav daughter)

रोहिणी पुढे म्हणाल्या, 'तुम्ही सर्वांनी फक्त प्रार्थना करा की, सर्व काही सुरळीत पार पडेल आणि माझे वडील पुन्हा तुम्हा सर्वांचा आवाज बुलंद करु शकतील... तुम्ही सर्वांनी दिलेल्या सदिच्छांबद्दल आभार...' (lalu yadav daughter rohini acharya)

Lalu Prasad Yadav यांची प्रकृती सुधारावी म्हणून मुलगी रोहिणी करणार मोठा त्याग

'ज्या वडिलांनी मला जगात ओळख दिली. जे माझे सर्वस्व आहेत. त्यांच्यासाठी मी माझ्या जीवनातील एक भाग देत असेल तर, मी स्वतःला भाग्यवान समजते. पृथ्वीवरील देव म्हणजे आई-वडील आहेत आणि त्यांची सेवा करणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे.' असं देखील रोहिणी म्हणाल्या. 

महत्त्वाचं म्हणजे रोहिणी यांनी वडील लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्यासोबत एक फोटो पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रिपोर्टनुसार, लालू प्रसाद यादव गेल्या अनेक दिवसांपासून किडनी निगडीत आजाराशी लढत आहेत. 

एवढंच नाहीतर, गेल्या अनेक वर्षांपासून किडनीच्या आजाराशिवाय इतरही अनेक आजारांनी ते त्रस्त आहेत. सध्या लालू प्रसाद यादव यांची किडनी 28 टक्के काम करत असून प्रत्यारोपणानंतर ते 70 टक्क्यांपर्यंत काम करू लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. Lalu Prasad Yadav Health update today Rohini Acharya will denate her kidney to father