लालू प्रसाद यादव यांची प्रकृती अस्थिर; रुग्णालयात दाखल

श्वास घेण्यास त्रस होत असल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

Updated: Jan 22, 2021, 09:13 AM IST
लालू प्रसाद यादव यांची प्रकृती अस्थिर; रुग्णालयात दाखल

रांची : चारा घोटाळ्यात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांची प्रकृती अचानक अस्थिर झाली आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गु्रूवारी सायंकाळी 7च्या सुमारास त्याची प्रकृती बिघडली. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लालू प्रसाद यादव यांच्य़ा प्रकृतीविषयी माहिती होताच नेत्यांनी रूग्णालया बाहेर एकच गर्दी केली. शिवाय झारखंडचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता यांनी देखील लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीची चैकशी केली. 

लालू प्रसाद यादव यांना रिम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर डॉक्टरांनी त्यांची प्रकृती आता स्थिर असल्यांचं सांगितलं आहे. लालूंच्या तब्येतीची माहिती मिळाल्यानंतर रिम्स रूग्णालयाने त्याच्या प्रकृती बद्दल माहिती दिली. त्यानंतर जेलचे आयजी बीरेंद्र भूषण यांनी त्यांच्या प्रकृतीची पुष्टी केली.

दरम्यान लालू प्रसाद यादव यांची कोरोना टेस्ट देखील करण्यात आली आहे. मात्र त्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. शुक्रवारी म्हणजे आज त्यांचं सीटी स्कॅन देखील करण्यात येणार असून अन्य चाचण्या सुद्धा केरण्यात येणार आहेत. 

लालू प्रसाद यांना किडनी आणि ह्रदयविकाराचा देखील त्रास आहे. त्याचप्रमाणे मधुमेह आणि उच्च रक्त दाबाचा त्रास देखील त्यांना आहे. लालू प्रसाद यादव यांच्या किडण्या केवळ 25 टक्के काम करत असल्याची माहिती रिम्सच्या डॉक्टरांनी दिली आहे..